Vinesh Phogat Congress: वेगळीच 'दंगल'! नोकरी सोडून काँग्रेसचा 'हात' धरला; विनेशच्या निर्णयावर Sakshi Malik नाराज

Vinesh Phogat vs Sakshi Malik: ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचा हात धरण्याचा निर्णय घेतला.
Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress
Vinesh Phogat Bajrang Punia Join Congressesakal
Updated on

Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress: पॅरिस ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतासाठी सलग तीन ऑलिम्पिक खेळणारी एकमेव महिला कुस्तीपटू असलेल्या विनेशने अनेकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. पण, ती राजकारणात प्रवेश करेल असे कुणाला वाटले नव्हते. मात्र, पॅरिसमधून परतल्यानंतर विनेशने काँग्रेसच्या राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती आणि आज तिने व बजरंग यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात हा प्रवेश केला. यावेळी अध्यक्ष मलिकार्जुन खरगे उपस्थित होते.

राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदकं, आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व कांस्यपदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कांस्य अशी अनेक पदकं जिंकणाऱ्या विनेशने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले होते. तिच्यासोबत बजरंग व साक्षी मलिक हे ऑलिम्पियनही होते. पॅरिसमध्ये विनेशवर अपात्रतेची कारवाई केली गेली, कारण तिचे वजन १०० ग्रॅम जास्त आढळले. यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.

आज विनेशने भारतीय रेल्वेतील नोकरीचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तिच्या निर्णयावर साक्षी मलिक मात्र नाराज दिसली. तिने म्हटले की, मलाही राजकीय पक्षांकडून ऑफर होत्या, परंतु मी त्या अमान्य केल्या. विनेशचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याचा आमच्या आंदोलनावर परिणाम होता कामा नये, एवढीच इच्छा आहे. महिला कुस्तीपटूंसाठी मी लढण्याच्या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार.

काँग्रेस पक्षाने विनेश फोगाटला हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. या तीन जागांमध्ये चरखी-दादरी, बधरा आणि जुलाना या जागांचा समावेश आहे. चरखी दादरी हा विनेश फोगाटचा जिल्हा आहे आणि जाटबहुल क्षेत्र आहे. बधरा हे विनेश फोगाटच्या बलाली गाव त्या अंतर्गत येते. या गावातून विनेशने कुस्तीच्या आखाड्यात प्रवेश केला आणि आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. जुलाना हे तिचे सासरचे घर आहे. जिथून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सोमवीर राठी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.