Vinesh Phogat's Retirement
Vinesh Phogat's Retirement esakal

Vinesh Phogat: "हे दु:ख तेव्हाच कमी होईल जेव्हा..."; काका महावीर फोगाट यांचे विनेशच्या निवृत्तीवर भावनिक आवाहन

Mahavir Phogat Speaks Out on Weight Controversy in Paris Olympic : विनेशच्या मेडिकल टीमने रातभर तिचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. तिला रात्रभर व्यायाम करायला लावले, स्किपिंग आणि सायकलिंगही केली. सॉना बाथ घेतला, आणि नखे कापली. पण सर्व प्रयत्नांनंतरही तिचे वजन ५०.१०० किलोग्रामच राहिले.
Published on

पॅरिस ऑलंपिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आले, त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली आहे. तिच्या या निर्णयाने कुस्तीप्रेमी चकित झाले आहेत. विनेशच्या या निर्णयावर तिचे काका महावीर फोगट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. विनेशला कुस्तीचे धडे देणारे तिचे ताऊ महावीर फोगट म्हणाले, "विनेश कधीही येईल तेव्हा तिला समजावू, अजून खेळायचे आहे आणि निवृत्तीचा निर्णय बदलावा. आम्ही तिला २०२८ ऑलंपिकची तयारी करण्याचे सांगू."

देशाची भावना-

महावीर फोगाट म्हणाले की, "स्पर्धेतून विनेशला अयोग्य ठरवणे देशाला दुखावणारे आहे. हे दुख तेव्हाच कमी होईल जेव्हा ती देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येईल."

निवृत्तीचा निर्णय का घेतला?-

महावीर फोगाट यांच्या मते, "जोही खेळाडू या पातळीपर्यंत पोहोचतो आणि अशा स्थितीत असतो तेव्हा तो रागात असे निर्णय घेतो."

वजन वाढल्यामुळे विवाद?-

विनेश फोगाटला पॅरिस ऑलंपिकमधून अयोग्य ठरवण्यामागचे कारण तिचे १०० ग्राम वजन जास्त असणे होते. बुधवारी तिचे वजन ५० किलो कॅटेगरीपेक्षा १०० ग्राम जास्त म्हणजे ५०.१०० किलोग्राम होते.

मंगळवारी सकाळी तिचे वजन ४९.९० किलोग्राम होते, जे ५० किलो कॅटेगरीसाठी योग्य होते. परंतु, सेमीफाइनलच्या सामन्यानंतर एनर्जीसाठी दिलेल्या अन्नामुळे तिचे वजन ५२.७०० किलोग्रामपर्यंत वाढले होते.

 Vinesh Phogat's Retirement
Vinesh Phogat Retirement: "माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई..." विनेशचा धक्कादायक निर्णय, जाहीर केली निवृत्ती

वजन कमी करण्याचे प्रयत्न-

विनेशच्या मेडिकल टीमने रातभर तिचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. तिला रात्रभर व्यायाम करायला लावले, स्किपिंग आणि सायकलिंगही केली. सॉना बाथ घेतला, आणि नखे कापली. पण सर्व प्रयत्नांनंतरही तिचे वजन ५०.१०० किलोग्रामच राहिले.

अखेरचा प्रयत्न-

गगन नारंग, दिनशॉ पारदीवाला, तिचा पती, फिजियो, मेडिकल स्टाफ, आयओए अधिकारी आणि भारतातील ओजीक्यू (ऑलंपिक गोल्ड क्वसेट) यांनी विनेशचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर मेहनत केली. डॉक्टर पारदीवाला यांनी सांगितले की, "आम्ही तिच्या जीवाला धोका देऊ शकत नाही."

 Vinesh Phogat's Retirement
Vinesh Phogat Retirement : ठरलं... विनेश फोगाटचे 'चॅम्पियन' म्हणूनच स्वागत होणार! रौप्यपदक विजेत्याला मिळणारा सन्मानही दिला जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.