Vinesh Phogat: विनेशने मिळवलं पॅरिस ऑलिंपिकचं तिकीट, आशिया पात्रता स्पर्धेत एकतर्फी विजय

Paris Olympic: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.
Vinesh Phogat | Paris Olympic
Vinesh Phogat | Paris OlympicSakal
Updated on

Vinesh Phogat: भारताची हुकमी कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली आहे. बिशकिक किर्गिस्तान येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत तिने कझाकिस्तानच्या लौरा गानिकझी हिचा 10-0 असा धुव्वा उडवला.

आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेशने हा सामना केवळ 4 मिनिटे 18 सेकंदात जिंकला, इतके वर्चस्व तिने मिळवले. पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताकडून कुस्तीसाठी मिळवलेला हा दुसरा कोटा आहे.

Vinesh Phogat | Paris Olympic
दुबईतील पावसाचा भारतीय खेळाडूांना बसला तडाखा! ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या आशा मिळणार धुळीस?

या स्पर्धेत विनेश ऑलिंपिक कोटा मिळवू शकेल, असे सुरुवातीपासून सांगितले जात होते. आपल्यावरील विश्वास कायम ठेवत तिने पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या चिऑन मिरानचा 10-0 असा धुव्वा उडवला होता.

त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिने कंबोडियाच्या डीत समनांग हिला अस्मान दाखवले. मिनीटभरात हा विजय विनेशने साकार केला होता.

Vinesh Phogat | Paris Olympic
Paris Olympics 2024 : बंदी उठताच पॅरिस ऑलिम्पिक आयोजक का वाटणार 3 लाख काँडोम्स?

53 किलो गट हा विनेशचा मुख्य गट आहे; परंतु ती 50 किलो गटात खेळत आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने 53 किलो गटात ब्राँझपदक मिळवलेले आहे. अंतिम पंघाल 53 किलो गटात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली असल्यामुळे विनेशने स्वतःच्या गटात हा बदल केला.

11 मार्च रोजी भारतात झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत विनेश 50 आणि 53 या दोन्ही गटांत सहभागी झाली होती; मात्र 53 किलो गटात तिला रेल्वेच्या अंजूकडून पराभव स्वीकारावा लागला होता; परंतु 50 किलो गटात तिने शिवानी हिच्यावर 11-6 अशी मात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.