Vinesh Phogat Wrestler Protest : सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो... आरोपपत्र दाखल होताच विनेशने रणशिंग फुंकले

Vinesh Phogat on Brij Bhushan Singh Charge sheet
Vinesh Phogat on Brij Bhushan Singh Charge sheet esakal
Updated on

Vinesh Phogat on Brij Bhushan Singh Charge sheet : दिल्ली पोलिसांनी अखेर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात बृजभूषण यांच्याविरूद्ध लावण्यात आलेले आरोपांबाबत कुस्तीपटू समाधानी नाहीत. पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध पोक्सो अॅक्ट लावलेला नाही. यानंतर आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाटने एक कविता सोशल मीडियावर पोस्ट करत पुढच्या आंदोलनचे रणशिंग फुंकले.

Vinesh Phogat on Brij Bhushan Singh Charge sheet
Wrestlers Protest : WFI च्या कार्यालयातही लैंगिक शोषण, 1500 पानी आरोपपत्राने बृजभूषण यांची झोप उडाली?

विनेशने सोशल मीडियावर पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता शेअर केली. या कवितेची भाषा ही आता आंदोलनापासून माघार नाही अशीच आहे.

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे...

छोड़ो मेहंदी खड्ग संभालो

खुद ही अपना चीर बचा लो

ध्यूत बिछाए बैठे शकुनि

मस्तक सब बिक जाएंगे

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे

तुम कब तक आस लगाओगी

बिके हुए अखबारों से कैसी रक्षा मांग रही हो

दुशासन दरबारों से स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं

वे क्या लाज बचाएंगे

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे।

Vinesh Phogat on Brij Bhushan Singh Charge sheet
BAN vs AFG : भारत-पाकला जमलं नाही, ते बांग्लादेशने करून दाखवलं, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

साक्षी काय म्हणाली?

विनेश फोगाटनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने या प्रकरणी आपलं म्हणणं मांडलं. ती म्हणाली आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की बृजभूषण शरण सिंह दोषी आहे. मात्र आमच्या वकिलांनी एक अर्ज दाखल केला आहे जेणेकरून ते लवकरात लवकर आरोपत्र पाहून बृजभूषण यांच्याविरूद्ध कोणते आरोप आहेत हे जाणून घेतील. आम्ही कुस्तीपटू सरकारने आम्हाला दिलेले वचन पाळले आहे की नाही हे पाहू. त्यानंतर आम्ही आमचे पुढचे पाऊल उचलू.

कुस्तीपटूंचे दीर्घ आंदोलन

जवळपास एक दशकापेक्षाही जास्त काळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेल्या बृजभूषण सिंह यांच्याविरूद्द महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. दिल्ली पोलिसांनी बऱ्याच दिवसांनी एफआयआर दाखल करून घेतली.

त्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुस्तीपटू बृजभूषण यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे बृजभूषण हे आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत यात राजकारण केलं जात असल्याचाही आरोप ते करत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.