Vinesh Phogat X Post: "डिअर हेटर्स, जरासा दम धरा..." ऑलिम्पिक गाजवत असलेल्या विनेश फोगटची पोस्ट व्हायरल

Vinesh Phogat And Wrestlers Protest: या ऐतिहासिक विजयासह विनेशचे पदक निश्चित झाले आहे. अशाप्रकारे विनेश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला कुस्तीपटू ठरणार आहे.
Vinesh Phogats Post Going Viral On X
Vinesh Phogats Post Going Viral On XEsakal
Updated on

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. विनेशने ५० किलो वजनी गटात क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा उपांत्य फेरीत 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या ऐतिहासिक विजयासह विनेशचे पदक निश्चित झाले आहे. अशाप्रकारे विनेश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला कुस्तीपटू ठरणार आहे. याआधी साक्षी मलिकने महिला कुस्तीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.

विनेश जर फायनल जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू तर ठरेलच, शिवाय ती पहिली भारतीय महिला खेळाडूही ठरेल.

विनेशने ही दमदार कामगिरी केल्यानंतर तिची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती विरोधकांना वाट पाह असे म्हणत आवाहन करत आहे.

विनेशचे ट्विट

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सतत विनेश फोगटला आणि आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना टार्गेट करत त्यांच्यावर टीका होत आहे. अशात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी 12 मार्च 2024 रोजी विनेशने एक्सवर पोस्ट केली होती.

या पोस्टमध्ये विनेश म्हणाली होती की, "डिअर हेटर्स, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप काही आहे ज्यामुळे तुम्ही वेड व्हाल. फक्त जरा दम धरा."

दरम्यान विनेशच्या कालच्या कामगिरीनंतर ही पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. आतापर्यंत या पोस्टला 13 लाख व्हिव्ज मिळाले आहेत. तर सुमारे 30 हजार युजर्सनी ही पोस्ट लाईक केली आहे.

Vinesh Phogats Post Going Viral On X
Vinesh Phogat: पॅरिसमध्ये विनेश जिंकली अन् काँग्रेसने केलं मोदींना ट्रोल, युजर्सनीही घेतली पंतप्रधानांची मजा

कुस्तीपटूंच्या आंदोलनावेळी विनेश टार्गेट

गेल्या वर्षीचा एप्रिल महिना देश विसरला नसावा जेव्हा आपल्या देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. देशातील नामवंत कुस्तीपटू लैंगिक शोषणाविरोधात जंतरमंतरवर निदर्शने करत होते आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला न्याय द्यावा, अशी मागणी करत होते.

Vinesh Phogats Post Going Viral On X
Vinesh Phogat: 'ही पोरगी जग जिंकेल, पण या देशाच्या सिस्टीमविरुद्ध...' विनेशच्या यशानंतर बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत

या आंदोलन करणाऱ्या खेळाडूंमध्ये साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश होता, त्यांनी वेळोवेळी ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदावरून हटवून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली, पण सरकार आणि पोलिसांनीही त्यांचे ऐकले नाही. पैलवान सराव सोडून विरोध करत होते.

सरकारला जागे करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ कुस्तीपटू लढत होते. यावेळी अनेक भाजप नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी या खेळाडूंवर टीका केली होती. तसेच काहींनी या खेळाडूंना देशद्रोहीसुद्ध म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.