FIFA World Cup: मोरक्कोकडून पराभवानंतर बेल्जियममध्ये उसळला हिंसाचार; वाहनांची जाळपोळ

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाकडे जगभरातील फुटबॉल सामन्यांकडे चाहत्यांचं लक्ष
FIFA World Cup
FIFA World CupEsakal
Updated on

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाकडे जगभरातील फुटबॉल सामन्यांकडे चाहत्यांचं लक्ष आहे. रविवारी फिफा स्पर्धेत बेल्जियमला मोरोक्को यांच्यात सामना झाला. दुबळा संघ मानल्या जाणाऱ्या मोरक्कोने बेल्जियमला पराभवाचा धक्का दिला. या घटनेचे पडसाद बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पाहायला मिळाले. ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करत वाहनांची तोडफोड केली. आंदोलकांनी गाड्या पेटवल्या.या हिंसाचारात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियमचा पराभव झाल्यानंतर ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळल्याचे दिसून आले. पराभव झाल्यामुळे संतापलेल्या लोकांना इलेक्ट्रिक कारसह अनेक स्कूटर्स, गाड्या यांना आग लावली. या घटनेनंतर ब्रसेल्स पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

FIFA World Cup
FIFA World Cup 2022 : कॉस्टारिकाच्या विजयाने चुरस वाढली

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फिफा फुटबॉल विश्वचषक सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमवर विजय मिळवल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये चाहत्यांनी निषेध नोंदवत कार आणि स्कूटर पेटवल्या. बेल्जियममध्ये दंगल झाली.

FIFA World Cup
FIFA World Cup 2022: इंग्लंडच्या संघाला फिफाची धमकी! 'या' कारणामुळे होणार मोठी कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.