विराट RCB च्या नाही तर PBKSच्या बालेकिल्ल्यात खेळणार 100 वी कसोटी

Virat Kohli 100th Test Will be Played in Mohali
Virat Kohli 100th Test Will be Played in Mohali esakal
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा शंभरावा कसोटी सामना बंगळूरऐवजी मोहालीत होणार आहे. बीसीसीआयकडून भारत - श्रीलंका यांच्यामधील मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. बदललेल्या नव्या वेळापत्रकानुसार आता दोन देशांमधील पहिला कसोटी सामना मोहालीत रंगणार आहे. विराटची ही शंभरावी कसोटी (Virat Kohli 100th Test) असणार आहे.

भारत - श्रीलंका यांच्यामध्ये पहिली टी-२० लढत लखनौ येथे पार पडेल. दुसरी व तिसरी टी-२० लढत धरमशाला येथे होणार आहे. दोन देशांमधील पहिला कसोटी सामना (Test Cricket) मोहाली व दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे खेळवण्यात येणार आहे. बंगळूर येथील कसोटी सामना प्रकाशझोतात खेळवण्यात येईल. दोन देशांमधील कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपअंतर्गत (World Test Championship) होणार आहे.

Virat Kohli 100th Test Will be Played in Mohali
IND VS WI - विश्वकरंडकाची तयारी आजपासून

श्रीलंकन बोर्डाची विनंती मान्य

श्रीलंकन संघ ऑस्ट्रेलियात सध्या टी-२० मालिका खेळत आहे. त्यामुळे भारताविरुद्ध सुरुवातीला टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला करण्यात आली होती. बीसीसीआयकडून ही विनंती मान्य करण्यात आली असून आता दोन देशांमध्ये सुरुवातीला टी-२० व नंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

Virat Kohli 100th Test Will be Played in Mohali
IND vs WI Playing 11 Prediction : ऋतूराज पुन्हा बाकावरच बसणार?

भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

पहिली टी-२० २४ फेब्रुवारी, लखनौ

दुसरी टी-२० २६ फेब्रुवारी, धरमशाला

तिसरी टी-२० २७ फेब्रुवारी, धरमशाला

पहिली कसोटी ४ ते ८ मार्च, मोहाली

दुसरी कसोटी १२ ते १६ मार्च, बंगळूर

(टीप - बंगळूर कसोटी प्रकाशझोतात असेल)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()