Virat Kohli 71st Century : 'शतक' एक शिकार अनेक! विराटने पाँटिंग, रोहित अन् स्वतःलाही टाकले मागे

Virat Kohli 71st International Century
Virat Kohli 71st International Century esakal
Updated on

Asia Cup 2022 Virat Kohli : भारताची रन मशिन आता फुल स्विंगमध्ये आली आहे. जवळपास 1121 दिवसांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. आशिया कपमधील भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरूद्ध त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. त्याने आपले 71 वे शतक पूर्ण करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील पहिलेच शतक आहे. त्याला ही टी 20 शतकी खेळी करण्यास सामन्यांचे शतक पार करावे लागले. मात्र 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे या शतकाने अनेक विक्रम केलेत. (Virat Kohli 71st International Century Broke Multiple Records Including Rohit Sharma and Ricky Ponting)

Virat Kohli 71st International Century
Virat Kohli : अखेर 1021 दिवसांची प्रतिक्षा संपली! 71 वे 'विराट' शतक साकारले

भारताकडून T20I मधील 'विराट' खेळी

विराट कोहलीने 61 चेंडूत 122 धावा ठोकल्या. विराट कोहलीचे हे टी 20 मधील पहिलेच शतक आहे. मात्र हे पहिलेच शतक टी 20 क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात विराट शतक ठरले.

विराट कोहली नाबाद 122 धावा 2022 अफगाणिस्तान

रोहित शर्मा 118 धावा 2017 श्रीलंका

सूर्यकुमार यादव 117 धावा 2022 इंग्लंड

रोहित शर्मा नाबाद 111 धावा 2018 वेस्ट इंडीज

केएल राहुल नाबाद 110 धावा 2016 वेस्ट इंडीज

Virat Kohli 71st International Century
Asia Cup IND vs AFG : भुवनेश्वरचा पंजा तर विराटचे शतक; भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक

शतकांचा शतकवीर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड कोण मोडू शकतो तर तो विराट कोहलची आहे ही खुद्द क्रिकेच्या देवाचीच भविष्यवाणी आहे. मात्र विराट कोहली या प्रवासात 70 शतकांवर अडकला होता. अखेर 1121 दिवसांनी त्याने आपले अडकलेले 71 वे शतक पूर्ण केले आणि सर्वाधिक शतकांच्या यादीत रिकी पाँटिंगशी बरोबरी केली.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक

सचिन तेंडुलकर 782 डावात 100 शतके

विराट कोहली 522 डावात 71 शतके

रिकी पॉटिंग 668 डावात 71 शतके

कुमार संगकारा 666 डावात 63 शतके

जॅक कॅलिस 617 डाात 62 शतके

Virat Kohli 71st International Century
Viral Video : सारा अली खान, शुभमन गीलच्या व्हिडिओवर ‘बहुत सारा प्यार’च्या शुभेच्छा

कोहलीची टी 20 मधील वैयक्तिक विराट खेळी

विराट कोहलीने आयपीएलमध्ये अनेक शतके ठोकली होती. मात्र टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणे त्याला शंभर सामने खेळले तरी जमले नव्हते. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय शतक ठोकलेच. हे शतक आयपीएलमधील सगळ्या शतकांवर भारी पडले.

विराट कोहलीच्या टी 20 मधील विराट खेळी

2022 अफगाणिस्तान 61 चेंडूत नाबाद 122 धावा

2016 पंजाब किंग्ज 50 चेंडूत 113 धावा

2016 गुजरात लायन्स 55 चेंडूत 109 धावा

2016 राईजिंग पुणे सुपरजायंट 58 चेंडूत नाबाद 108 धावा

2016 गुजरात लायन्स 63 चेंडूत नाबाद 100 धावा

2019 केकेआर 58 चेंडूत 100 धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.