कोरोनाच्या लढ्यासाठी 'विरुष्का' मैदानात

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने कोविड-19 च्या संकटजन्य परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी Ketto नावाची मोहिम सुरु केलीय.
virat and anushka
virat and anushkatwitter
Updated on

कोरोना विषाणूच्या (coronavirus ) वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांचे जन जीवन विस्कळीत झाले आहे. 2019 मध्ये आलेली कोरोनाची लाट अजूनही शमलेली नाही. या संकटातून जग सावरत असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाजन्य परिस्थितीत (corona pandemic) अनेक लोक आर्थिक मदत करताना पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या स्विट कपलने कोरोना लढ्यासाठी मोठी आर्थिक मदत दिली आहे.

virat and anushka
मिशन ऑक्सिजन इंडिया; सचिन तेंडुलकरकडून 1 कोटींची मदत

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने कोविड-19 च्या संकटजन्य परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी Ketto नावाची मोहिम सुरु केलीय. या मोहिमेच्या अंतर्गत अनुष्का कोरोनाग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. विराट कोहली पत्नीला सहाकार्य करत आहे.

या जोडीने कोरोनाच्या लढ्यासाठी 2 कोटींची मदत केलीये. याशिवाय लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्यासाठी ही दोघ लोकांना आवाहनही करताना दिसते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विराट कोहलीने 3 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती.

virat and anushka
IPL 2021: आता स्पर्धा UAE त होणार? गांगुली म्हणाले...

विराट-अनुष्काने Tweeter शेअर केलाय व्हिडिओ

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. आरोग्य व्यवस्था तुटपूंजी असून आपल्याला सर्वांना एकत्रित लढायचे आहे. आपल्या लोकांना दु:खात पाहवत नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आम्ही दोघांनी मिळून KEtto मोहिम सुरु केलीय. कृपया भारत आणि भारतीयांच्या मदतीसाठी पुढे या. आपले योगदान अनेक लोकांचा जीवनदान देऊन शकते.

जगभरात 15 कोटीं पेक्षाअधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. 32 लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्याच्या घडीला देशात प्रत्येक दिवशी 4 लाख रुग्ण आढळत आहते. आतापर्यंत 2 लाख 30 हजार लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या संकटाच्या परिस्थितीत विराट आणि अनुष्का या स्विट कपलने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.