T20WC : नेदरलँडविरुद्ध विजयानंतर सूर्याने व्यक्त केल्या भावना, 'विराट कोहलीने...'

पहिला सामना जरा जास्तच नाट्यमय झाला कोणीच सामना संपल्यावर लगेच झोपू शकले नाही
Virat Kohli and Suryakumar Yadav
Virat Kohli and Suryakumar Yadav sakal
Updated on

Virat Kohli and Suryakumar Yadav : विराट कोहलीबरोबर फलंदाजी करायला मजा येते. आम्ही दोघे खेळाचा आनंद घेतो. तो इतका मस्त फॉर्ममध्ये आहे की माझ्यावर दडपण कमी येते. मला फक्त माझ्या योजनांचा पाठपुरावा करायचा असतो. आम्ही शक्य तेवढ्या जोरात पळून क्षेत्ररक्षकांवर दडपण आणतो, असे मत नेदरलँडसविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार म्हणाला.

भारतीय संघाने सलग दुसऱ्‍या सामन्यात चांगला विजय संपादल्याने वातावरण आनंदी होते. ‘पहिला सामना जरा जास्तच नाट्यमय झाला. कोणीच सामना संपल्यावर लगेच झोपू शकले नाही इतका त्याचा थरार सतत डोळ्यांसमोर दिसत होता. चांगले झाले की तीन दिवसांनी दुसरा सामना होता. संघ व्यवस्थापनाचे स्पष्ट सांगणे होते की, प्रत्येक सामना त्याच एकाग्रतेने खेळायचा आहे. त्याच कारणाने संपूर्ण ताकदीचा संघ प्रत्येक सामन्यात मैदानावर उतरवला जाणार होता, असे सूर्यकुमारने सांगितले.

Virat Kohli and Suryakumar Yadav
Sourav Ganguly : BCCI च्या ऐतिहासिक घोषणेनंतर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया; वाचा कोणाला दिले श्रेय

‘रोहितने चांगली फलंदाजी करून पाया रचून दिला होता, ज्यावर आम्ही दोघांनी पुढची धावसंख्या उभारली. मेबलर्नच्या तुलनेत सिडनीला चेंडू किंचित थांबून येत असल्याने पाय पुढे टाकून मोठे फटके सतत मारणे शक्य नव्हते. गोलंदाजांनीही आखलेल्या योजनांचा योग्य पाठपुरावा केला’, असे सूर्यकुमार वर्णन करताना म्हणाला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे किती आव्हानात्मक आणि त्याकरता काय तयारी केली होतीस, असे विचारता सूर्यकुमार म्हणाला, ‘मी सरावादरम्यान विविध फटके बऱ्‍याच वेळा वापरून बघतो आणि मगच सामन्यात तसे मारतो. त्याचबरोबर सरावात मी स्वत:करता दडपण निर्माण करतो. अमुक चेंडूत तमुक धावा असे लक्ष ठेवतो आणि ते पार करताना बाद झालो तर त्या क्षणाला जाळ्यातील सरावादरम्यान फलंदाजी थांबवतो.

Virat Kohli and Suryakumar Yadav
T20WC : ऑस्ट्रेलियात पावसाचा कहर! दोन्ही सामने गेले वाहून, गट-1 मध्ये कसे आहे गणित

थोडक्यात, मी सामन्यात काय अवस्था असताना मला खेळावे लागेल त्याची वातावरण निर्मिती करतो. सध्या जे काही कष्ट केले, सराव केला, त्याचे थोडे प्रतिबिंब मैदानात उतरवता येते आहे याचा आनंद आहे. शेवटी मी इतकेच सांगेन की, चांगल्या खेळाची लय घट्ट पकडून ठेवायची आहे आम्हाला, असे सूर्यकुमारने सांगितले.

पाच तासांचा प्रवास

शुक्रवारी दुपारच्या विमानाने पाच तासांचा प्रवास करून भारतीय संघ सिडनीहून पर्थला आला. एक दिवस थोडा सराव करून संघ दक्षिण आफ्रिकेसमोरच्या महत्त्वाच्या सामन्याला भिडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.