South Africa vs India, 1st ODI : पार्ल येथील बोलँड पार्कवर विराट कोहली (Virat Kohli) चे तेवर कसे असणार? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडला होता. महेंद्रसिंह धोनीनंतर कोहली पहिल्यांदाच अन्य कुणाच्यातरी नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. मागील अनेक वर्षांपासून प्रत्येकाने त्याचा कॅप्टन्सीचे तेवर मैदानात पाहिले. आता इथून पुढे त्याचा तो आक्रमकपणा दिसणार का? तो त्याच तोऱ्यात मैदानात वावरणार का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते. विराट कोहलीने त्याची झलकही दाखवून दिली.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहली (Virat Kohli) मध्ये तोच आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. फिल्डिंगवेळी त्याने आपल्यातील ऊर्जा कायम असल्याची झलक दाखवून दिली. कॅप्टन नसलो तरी खेळाडू म्हणून खेळतानाही जुने तेवर दाखवणारच याचे संकेत कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत फिल्डिंगवेळी दिले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा (Temba Bavuma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली.
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बवुमाने कव्हरच्या दिशेने फटका खेळला. चेंडू थेट विराट कोहलीच्या हाती गेला. शॉट खेळल्यानंतर बवुमा क्रिजमध्ये परतत असताना कोहलीने रागाने त्याच्या दिशेने चेंडू फेकल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोघांच्या डोळ्यातल्या डोळ्यात संवाद झाला आणि खेळ पुन्हा सुरु झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) यावेळी चांगलाच रागावलेला दिसला. क्रिजमधून बाहेर पडलास तर थ्रो तर मारणारच असाच काहीसा तोऱ्यात विराट कोहलीने प्रतिस्पर्धी संघालीत कॅप्टनला जागा दाखवली. विराट कोहलीने फलंदाजीवेळीही अर्धशतकी खेळी केली. तो शतकाचा दुष्काळ संपवून टीम इंडियाला सामना जिंकून देईल असे वाटत होते. मात्र पुन्हा एकदा भ्रम निरास झाला. कोहली अर्धशतकानंतर तंबूत परतला. बाद होण्यापूर्वी त्याने परदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.