Virat Kohli : 'मानसिकदृष्ट्या खचलो होतो मात्र दाखवून द्यायचो नाही'

Virat Kohli Asia Cup 2022 Statement About fake intensity and mentally Weak
Virat Kohli Asia Cup 2022 Statement About fake intensity and mentally Weak esakal
Updated on

Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी ब्रेकवर गेला होता. आता तो आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघात परतला असून आपल्या बॅड पॅचवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास 1000 दिवसांपासून त्याच्या बॅटमधून शतक आलेले नाही. तो इंग्लंड दौऱ्यावर फेल गेल्यानंतर त्याला वेस्ट इंडीज आणि झिम्बब्वेविरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. हा ब्रेक विराट कोहलीसाठी का महत्वाचा होता हे विराट कोहलीने सांगितले. याचबरोबर आपण मानसिकदृष्ट्या कसे कणखर आहोत हा फसवा भास करून देण्याचा देखील प्रयत्न केल्याचे तो सांगतो. (Virat Kohli Statement About Fake Intensity And Mentally Weak)

Virat Kohli Asia Cup 2022 Statement About fake intensity and mentally Weak
Sara Tendulkar : सारा कधी करणार लग्न! VIDEO मधून केला मोठा खुलासा

विराट कोहली बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणतो की, 'गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच मी संपूर्ण एक महिना बॅटला स्पर्श देखील केला नव्हता. मला जाणीव झाली होती की मी मानसिकदृष्ट्या कणखर आणि खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून देत होतो मात्र तसे नव्हते. मी भास करून देत होतो. मी कायम स्वतःला सांगत होतो की तू हे करू शकतोस, तू स्पर्धात्मक वृत्तीचा आहेस. तुझ्या खेळात ती तीव्रता आहे. मात्र माझे शरीर सांगत होते की आता थांब, ब्रेक घे थोडी माघार घे. मी मानसिकदृष्ट्या खूप कणखर असल्याचे दिसतो. मी आहे देखील. मात्र सर्वांच्या मर्यादा असतात, त्या मर्यादा ओळखण्याची गरज असते. नाही तर गोष्टी तुमच्यासाठी योग्य रहात नाहीत.'

विराट कोहली व्हिडिओत पुढे म्हणतो की, 'या संघर्षाच्या काळाने मला खूप काही शिकवले. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी मी बाहेर येऊ देत नव्हतो. मात्र त्या बाहेर आल्यानंतर मी त्याचा खुल्या दिलाने स्विकार केला. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो हे मान्य करायला मला लाज वाटत नाही. हे सामान्य आहे. मात्र याबाबत आपण कधी बोलत नाही. आपण मानसिकदृष्ट्या कमजोर झालो आहोत असे लोकांसमोर आपण दाखवून देत नाही. विश्वास ठेवा मी मानसिकदृष्ट्या कमजोर झालो आहे हे मान्य करणे सोपे मात्र मानसिकदृष्ट्या कणखर आहे असा भास करून देणे हे फार कठिण असते.'

Virat Kohli Asia Cup 2022 Statement About fake intensity and mentally Weak
Asia Cup : Team India चा मुक्काम दुबईला 'या' आलिशान हॉटेलमध्ये, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

विराट कोहलीला मैदानावरील इंटेनसिटीबद्दल विचारले असता त्याने 'मी असा व्यक्ती आहे की प्रत्येक दिवशी सकाळी उठतो आणि आजच्या दिवसात माझ्यासाठी काय आहे हे पाहू याचा विचार करत असतो. मी रोजची सर्व कामे पूर्ण मन लावून आणि आनंदाने करतो. मानसिक ताणाचा फिल्डवर असताना इतक्या चांगल्या प्रकारे, त्यात उर्जेने तू कसा सामना करू शकतोस असे लोक विचारतात. मला या खेळाविषयी खूप प्रेम आहे. मला या खेळाला खूप काही द्यायचं आहे. मी कायम फिल्डवर असताना माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो.'

कोहली पुढे म्हणाला, 'ही माझ्यासाठी काही वेगळी गोष्ट नाही. बाहेरचे लोक आणि संघातीलही काही लोक तू इतकी उर्जा काठून आणतो असे विचारतात. मी फक्त एक साधी गोष्ट सांगतो, मला माझा संघ कोणत्याही परिस्थितीत जिंकावा असे वाटते. मी मैदानावर त्यासाठीच धापा टाकत असतो. मी अशा प्रकारे खेळण्यासाठी खूप तयारी करतो. ते गेल्या काही काळात नैसर्गिकरित्या होत नव्हते. मला ते करण्यासाठी स्वतःला पूश करावे लागत होते. फक्त मला हे माहिती नव्हते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.