विराटला टक्कर देण्यासाठी संघात आला 'हा' बलाढ्य खेळाडू

आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत पहिल्यांदाच एका युवा खेळाडूला टीम इंडियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
Virat Kohli
Virat Kohliesakal
Updated on

आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत पहिल्यांदाच एका युवा खेळाडूला टीम इंडियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये धावा करत या खेळाडूने निवड समितीची मन जिंकले आहे. हा खेळाडू तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, जी टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा आहे.

Virat Kohli
IND v SA: निर्णायक सामन्यात पावसाचे विघ्न?

हार्दिक पांड्याकडे या मालिकेत टीम इंडियाची कमान असणार आहे. राजस्थान रॉयलचा कर्णधार संजू सॅमसनचे पण पुनरागमन होत आहे. IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मधल्या फळीत उत्कृष्ट कामगिरी करणारा राहुल त्रिपाठीला या मालिकेत प्रथमच टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे. त्रिपाठी या दोन्ही T20 सामन्यांमध्ये संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील दिसू शकतो. संघ निवडीपूर्वी राहुल त्रिपाठीने अनेक शानदार खेळी खेळून भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

राहुल त्रिपाठी 2017 पासून आयपीएलचा एक भाग आहे. त्रिपाठीने प्रत्येक हंगामात धावा केल्या आहेत, मात्र आता त्याला टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. राहुल त्रिपाठीने IPL 2022 च्या 14 सामन्यांमध्ये 37.55 च्या सरासरीने 413 धावा केल्या. या हंगामात त्याने 158.24 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि 3 अर्धशतकेही झळकावली आहे. राहुल त्रिपाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.

Virat Kohli
IPL कॅप्टन्सी गमावल्यानंतर जडेजा ऍक्शनमोडमध्ये; इंग्लंडला पोहोचताच ट्विट...

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ -

हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, संजू सैमसन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.