Virat Kohli : ब्रँड व्हॅल्यूत विराट कोहलीच 'किंग', रणवीर काय शाहरूख खानलाही टाकलं मागं

Virat Kohli Brand Value : विराट कोहलीसाठी टी 20 वर्ल्डकप फार चांगला जात नसला तरी ब्रँडिंगच्या बाबतीत तो भारतातला किंगच आहे.
Virat Kohli
Virat Kohli Brand Valueesakal
Updated on

Virat Kohli Brand Value : आयपीएल 2024 चे विजेतेपद शाहरूखच्या केकेआरनं जिंकलं असलं तरी भारतात ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीचाच डंका वाजतो. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला विराट कोहली हा भारतातील सर्वात चांगली ब्रँड व्हॅल्यू असलेला सेलिब्रेटी आहे. त्याने या यादीत स्टार शाहरूख खान आणि रणवीर सिंहला देखील मागं टाकलं आहे.

विराट कोहलीसाठी टी 20 वर्ल्डकप 2024 ची ग्रुप स्टेज फारशी काही चांगली गेलेली नाही. मात्र याचा त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Virat Kohli
Kylian Mbappe : फ्रान्सला बसला मोठा धक्का; स्टार एम्बाप्पे युरो कपच्या संपूर्ण ग्रुप स्टेजच्या सामन्यांना मुकणार

कन्सल्टन्सी फर्म क्रोलने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीची एकूण ब्रँड व्हॅल्यू ही गेल्या वर्षभरात 29 टक्क्यांनी वाढली आहे. 2023 मध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू ही जवळपास 227.9 मिलियन युएस डॉलर इतकी होती. या यादीत दुसऱ्या स्थानावर रणवीर सिंह असून त्याची ब्रँड व्हॅल्यू ही 203.1 मिलियन युएस डॉलर आहे. तर केकेआरचा मालक आणि सुपरस्टार शाहरूख खानची ब्रँड व्हॅल्यू ही 120.7 युएस डॉलर इतकी आहे.

या यादीत एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरचे देखील नाव आहे. धोनीची ब्रँड व्हॅल्यू ही 95.8 मिलियन डॉलर इतकी असून सचिनची ब्रँड व्हॅल्यू ही 91.3 मिलियन डॉलर इतकी आहे.

Virat Kohli
Gautam Gambhir : गंभीर नाही एकटा, दुसऱ्या उमेदवारानं बीसीसीआयला केलं प्रभावित; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मते विराट कोहलीचा सध्याचा टी 20 वर्ल्डकपमधील खराब फॉर्म हा फार चिंतेचा विषय नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. विराट कोहलीला तीन सामन्यात फक्त 5 धावा करता आल्या आहेत. तो युएसएविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. विराट सध्या रोहित शर्मा सोबत सलामीला येत आहे.

बांगरच्या मते न्यूयॉर्कची खेळपट्टी आव्हानात्मक होती. विराट कोहली आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच सलामीला खेळत होता. भारताचा फ्लोरिडामधील कॅनडाविरूद्धचा सामना हा वॉश आऊट झाला होता.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.