आजही विराट इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेतो 8 कोटी, कमाईत आशियामध्ये अव्वल

अडीच वर्षांपासून त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही, तरी मैदानाबाहेर मात्र किंग कोहलीची हवा मात्र अजून कायम आहे.
 virat kohli
virat kohli sakal
Updated on

virat kohli Instagram : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही, तरी मैदानाबाहेर मात्र किंग कोहलीची हवा मात्र अजून कायम आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची त्याला कमी नाही. विराट कोहली सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून वर्चस्व गाजवत आहे. इंस्टाग्रामवरील एका पोस्टवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये कोहली अव्वल आहे. एकूण खेळाडूंच्या यादीत कोहली जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

View this profile on Instagram

Virat Kohli (@virat.kohli) • Instagram photos and videos

 virat kohli
वेस्ट इंडिजला जाण्यासाठी टीम इंडियासाठी BCCI ने मोजले तब्बल 3.5 कोटी रुपये

विराट कोहली बॅटने धावा करत नसला तरी तो आशियातील सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी आहे. विराट कोहली त्याच्या प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवरून 8 कोटी रुपये कमावतो. कोहलीचे सध्या 20 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलीकडेच hopperhq.com ने 2022 ची इंस्टाग्राम रिच लिस्ट जारी केली आहे. विराट कोहली यामध्ये 14 व्या स्थानावर आहे. या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. प्रियांकाला प्रति पोस्ट सुमारे 3 कोटी रुपये मिळतात.

 virat kohli
Video : इसरलंय! बॅड्समन पॅड्स न घालताच मैदानात

विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्स आहेत. त्याच्या जवळ एकही भारतीय नाही. इतकेच नाही तर गेल्या वर्षी 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट पहिला भारतीय ठरला आहे. फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो, कायली जेनर (345 मिलियन), लिओनेल मेस्सी (327 मिलियन फॉलोअर्स), सेलेना गोम्स (325 मिलियन) आणि ड्वेन जॉन्सन (320) विराटच्या पुढे आहेत. गेल्या काही काळापासून विराट कोहलीच्या बॅटतून धावा निघत नसल्यातरी सोशल मीडियावर बादशहा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.