Virat Kohli : जगात भारी विराट कोहली! वनडेत शतकांची पन्नाशी पार, सचिनचा विश्वविक्रम 23 वर्षानंतर मोडला

Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Records : विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक ठोकले. त्याने ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर अजून एक मोठा इतिहास रचला. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचे वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम 23 वर्षानंतर मोडला. सचिनने 2012 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरूद्ध आपले 49 वे वनडे शतक ठोकले होते.

Virat Kohli
India In World Cup Final : मोहम्मद शामीचा विकेट्सचा 'सत्ता', भारत पोहचला फायनलमध्ये

विराट कोहलीने 279 डावत 50 वनडे शतके ठोकली आहेत तर सचिन तेंडुलकरने 452 डावात 49 शतके ठोकण्याची कामगिरी केली होती. वनडे क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर तीन भारतीयच आहेत. तिसऱ्या स्थानावर 31 शतकांसह रोहित शर्मा विराजमान आहे. तर चौथ्या स्थानावर रिकी पाँटिंग आङे.

वनडेत सर्वाधिक शतके :
50 - विराट कोहली
49 - सचिन तेंडुलकर
31 - रोहित शर्मा
30 - रिकी पाँटिंग
28 - सनथ जयसुर्या

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे मधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यापूर्वी अजून एक विक्रम मागे टाकला होता. त्याने एका वनडे वर्ल्डकप एडिशनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मोडला. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 711 धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये 700 धावा करणारा देखील विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील एका एडिशनमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.