Virat Kohli Hit Century In 500th International Match : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांना प्रतिक्षा होती ती विराट कोहलीच्या शतकाची! विराट कोहलीने ही प्रतिक्षा 90 व्या षटकात गॅब्रिएलच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत संपवली. (Virat Kohli Century)
विराट कोहलीने तब्बल 5 वर्षानंतर आपले 29 वे कसोटी शतक साजरे केले. याचबरोबर तो 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. विराट कोहलीचे हे 76 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. विराट कोहलीने तब्बल पाच वर्षानंतर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली आहे.
विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 4 बाद 288 धावांपासून पुढे नेण्यास सुरूवात केली. या दोघांनी कालच पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती.
आज विराट कोहलीने आपले 76 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात वेगाने 76 शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याचबरोबर विराटने 29 वे कसोटी शतक ठोकत सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी देखील बरोबरी केली आहे. (West Indies Vs India 2nd Test)
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर रविंद्र जडेजाने देखील आपले अर्धशतक पूर्ण करत ही भागीदारी 150 च्या जवळ पोहचवली. विराट कोहली आणि रविंद्र जडेजाच्या या भागीदारीमुळे भारताने 300 धावांचा टप्पा पार केला.
पहिल्या दिवशी भारताची सलामी जोडी यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माने 139 धावांची दमदार सलामी दिली होती. जैसवालने 57 धावांची तर रोहित शर्माने 80 धावांची खेळी केली. मात्र यानंतर शुभमन गिल 10 धावांची तर अजिंक्य रहाणे 8 धावांची भर घालून माघारी परतले.
विंडीजने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रावर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. मात्र विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने तिसऱ्या सत्रात विंडीजला एकही यश मिळू न देता वेगाने धावा करत भारताला 4 बाद 288 धावांपर्यंत मजल मारून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.