Virat Kohli : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराटच किंग; रोहितला टाकलं मागं

पहिल्या कसोटीत विराट कोहलीने डाव सावरला, याचबरोबर एक माईल स्टोन देखील पार केला
Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

Virat Kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं. भारताची अवस्था 3 बाद 24 धावा अशी झाली होती. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरत भारताला उपहारापर्यंत 91 धावांपर्यंत पोहचवलं.

दरम्यान, विराट कोहलीने आपल्या या खेळीदरम्यान एक मोठा माईलस्टोन देखील पार केला. विराट कोहली हा आता भारताकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Virat Kohli
SA vs IND 1st Test : पहिला दिवस केएल राहुल अन् रबाडाने गाजवला; पावसामुळे खेळ लवकर थांबवला

विराट कोहलीने WTC मध्ये 35 सामने आणि 57 डावात 2101 धावा केल्या आहेत. यात 4 शतकी तर 9 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने 26 सामने आणि 42 डावात 2097 धावा केल्या आहेत. यात 7 शतकी तर सहा अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा असून त्याने 35 सामन्यात 62 डावात 1769 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 1 शतक तर 15 अर्धशतके ठोकली आहेत.

Virat Kohli
Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटपटूंना तालिबानी फतवा; तीन खेळाडूंचा करार रद्द, IPL समावेशालाही ग्रहण

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारताची 3 बाद 24 अशी अवस्था केली होती. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत भारताला उपहारापर्यंत 91 धावांवपर्यंत पोहचवले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली होती.

मात्र उपहारानंतर रबाडाने भारताही ही जमलेली जोडी फोडली. त्याने आधी अय्यरला 31 धावांवर त्यानंतर विराट कोहलीला 38 धावांवर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 107 धावा अशी केली.

यानंतर केएल राहुलने अश्विन सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रबाडाने अश्विनला देखील 8 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. अखेर राहुलने शार्दुल ठाकूरच्या साथीने भारताला 150 धावांचा टप्पा पारू करून दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.