Blog: विराट भावा सांभाळून नाहीतर तुझा स्टीव्ह स्मिथ होईल

Virat Kohli behavior
Virat Kohli behavioresakal
Updated on

विराट कोहली आणि वाद हे दोघे जुळे भाऊ आहेत. या दोघांनाही एकमेकांपासून कुंभ मेळाही वेगळे करु शकत नाही. (Virat Kohli Controversy) विराट कोहली मैदानावर गेलाय आणि वाद झालेला नाही असं क्वचितच घडतं. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं उदाहरण घ्या. पहिल्या दोन कसोटीत वातावरण शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) फिट झाला आणि मैदानावर परतला. पण, विराट एकटात मैदानावर आला नाही तर त्याचा जुळा भाऊ वाद यालाही तो मैदानावर घेऊन आला. (Virat Kohli behavior)

भारताने दुसरी कसोटी गमावल्यामुळे मालिका १ - १ अशी बरोबरीत आली होती. त्यामुळे दोन्ही संघ तिसऱ्या कसोटीत मालिका विजयासाठी त्वेषाने खेळणार यात शंकाच नव्हती. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा तर दुसऱ्या कसोटीत विजयी घास हिरावून घेतला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत (RSA vs IND 3rd Test) भारत सर्वस्व पणाला लावणार यात शंका नव्हती. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपले सर्वस्व पणाला लावताना मर्यादा आणि संस्कारही पणाला लावले. विराट आक्रमक आहे यात शंका नाही. मात्र त्याची आक्रमकता कधी कधी इतकी टोकाला जाते की त्याचा फटका भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेलाही (Indian Cricket Image) बसतो.

दक्षिण आफ्रिका आणि भारताचे क्रिकेट संबंध हे एका वेगळ्यात पातळीवरचे आहेत. वर्णद्वेशाचे भूत गाडून १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पहिल्यांदा भारतातच खेळणे पसंत केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे राजनैतिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन महान व्यक्तीमत्वाची या संबंधांवर छाप आहे. त्यामुळे या दोन देशांमधील क्रिकेट सामने हे वेगळ्या पातळीवरचे असतात. मात्र तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने स्टंप माईक जवळ जाऊन जे काही माकड चाळे केले ते भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील क्रिकेट संबंधांच्या पार्श्वभूमीवर एकदम उलटे होते.

Virat Kohli behavior
टीम इंडियाचा भ्रमाचा भोपळा फुटला; आफ्रिकेनं पिछाडीवरुन मारली बाजी

निषेध योग्य ठिकाणी नोंदवला की उलटा परिणाम होत नाही विराट!

विराट कोहली नक्कीच स्वतःसाठी भांडला नाही. तो पहिल्यांदा डीन एल्गरच्या DRS वरुन चिडला. त्यानंतर त्याने ब्रॉडकास्टर भारतीय खेळाडू बॉल शाईन करत असतानाच कॅमेरा त्यांच्यावर खिळवून ठेवत होते. यामुळे विराट कोहली चिडला आणि त्याने स्टंप माईकजवळ जाऊन ब्रॉडकास्टर्सना सुनावले. त्याची ही माईकवाणी सर्वांनीच ऐकली. मात्र विराट कोहलीला हे करणं गरजेचं होतं का? विराट आपली नाराजी पत्रकार परिषदेतून व्यक्त करु शकला असता. ( जर पत्रकार परिषदेला हजर राहिला तर ) तो सामना अधिकाऱ्यांकडे योग्य चायनल मार्फत तक्रार दाखल करु शकला असता. पण, विराट कोहलीच तो! संयम नावाचा प्रकार त्याच्याकडे नाहीच.

Virat Kohli behavior
Video: ब्रॉडने लॅम्बुशग्नेचा त्रिफळा उडवलाच, तोंडावरही पाडले

केपटाऊनमधील सँडपेपर मस्तीच स्मिथला भोवली

बर २०१८ ला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) बाबत झालेला किस्सा आठवतो का? हेच बॉल टॅम्परिंग (Ball Tampering) प्रकरण स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरला केवढ्याला पडले होतं? दोघांनाही एक वर्षाची बंदी भोगावी लागली होती. या बंदीपूर्वी स्टीव्ह स्मिथ जागतिक स्तरावरील एक अव्वल फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. आता... कर्णधारपदही गेलयं आणि स्टार फलंदाज, अव्वल दर्जाही गेलायं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या असल्या मुल्यांना धरून नसलेल्या प्रवृत्तीमुळे देशाची बदनामी होते एवढ्यासाठी या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला घरात बसवलं. संघ त्यांच्याविना जिंकेल की नाही याची तमा न बाळगता त्यांनी या दोघांचं स्टारपण काढून घेतलं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेसच्या तोंडावर आपला कर्णधार बदलला. कारण फक्त आपली प्रतिमा डागाळली जाईल म्हणून! याला काही राजकीय कंगोरेही असतील मात्र त्यांनी धाडसी निर्णय घेतले. आता त्यांचा नवा कर्णधार म्हणतोय की आधीचे खेळाडू स्लेजिंग करत होते म्हणून आम्ही करायची गरज नाही. बर या त्याच्या पवित्र्यामुळे संघाच्या निकालात काय फरक पडलायं का? ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका ३ - ० ने जिंकली तीही दोन सामने शिल्लक असतानाच.

Virat Kohli behavior
'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

९२ - ४ गुणफरकाने जिंकून देणारा कोच निलंबीत झाला

काही दिवसांपूर्वीच न्यू यॉर्क टाईम्सची बातमी वाचनात आली. बातमी काय होती तर एका शाळेच्या बास्केटबॉल कोचला संघ ९२ - ४ अशा मोठ्या गुणफरकाने जिंकला म्हणून निलंबीत करण्यात आले. या निकालाला ब्रुटल म्हणजे निर्दयी असा ठरवण्यात आले. या निकालाचा लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल म्हणून जिंकणाऱ्या संघाच्या प्रशिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली. ही कारवाई योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा जरा बाजूला ठेवा. पण, या मागचा प्रशासनाचा उद्येश साफ होता. मुलांच्या जडणघडणीवर कोणताही विपरित परिणाम होऊ नये. मग तो मिळवलेला मोठा विजयच का असेना!

जर क्रीडा जगतात इतक्या टोकाचे निर्णय फक्त मुल्य जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीला योग्य शिकवणूक मिळवा यासाठी होत असतील तर हा ट्रेंड भारतात यायला वेळ लागणार नाही. पॅट कमिन्स परवाच बोलला होता की, सर्वच देशांनी खेळातील आपला आवाज जरा कमी करण्याची गरज आहे. ही गरज जर भारताला, बीसीसीआयला वाटू लागली तर विराट कोहलीच काही खरं नाही. कारण पहिली सूरी विराट कोहलीवरच चालवली जाईल. तसंही विराट आणि बीसीसीआयमध्ये बिनसलं आहे. त्याची एकदिवसीय कॅप्टन्सी गेलीच आहे. अशा वागण्याने कसोटीतील कॅप्टन्सी आणि संघातील स्टारपणही जाणार नाही असे आता कोण छाती ठोकपणे सांगणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.