Ajinkya Rahane : रहाणेला परत बोलवा... विराटवर भडकलेल्या चाहत्यांची जोरदार मागणी

Virat Kohli Dropping Catches
Virat Kohli Dropping Catches esakal
Updated on

Virat Kohli Dropping Catches : विराट कोहली हा जगातील अव्वल क्षेत्ररक्षक मानला जातो. मैदानावर त्याच्या क्षेत्ररक्षणाची उदाहरणे दिली जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सातत्याने निराशा करत आहे. कसोटीत विराट स्लिपमध्ये फिल्डिंग करतोय. तिथे तो सतत झेल सोडतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात विराटचे दोन झेल सोडले. याआधी विराटने बांगलादेश दौऱ्यावर कसोटी सामन्यांमध्येही एक झेल सोडला होता.

Virat Kohli Dropping Catches
Rohit Sharma : अश्विन - जडेजानं भंडावून सोडलं; रोहित म्हणाला यांना आपली रेकॉर्ड्स...

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या डावातही एक झेल सोडला. रविचंद्रन अश्विनचा चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. विराटसाठी हा एक सोपा झेल होता पण त्याला तो पकडला नाही. चेंडू हाताला लागून खाली पडला . टर्निंग पिचवर स्लिप फिल्डरची भूमिका खूप महत्त्वाची असते. मात्र विराट सातत्याने निराशा करत आहे. म्हणूनच आज भारतीय क्रिकेट चाहच्यांना भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेची प्रकर्षाने आठवण झाली.

अजिंक्य रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून भारताकडून कसोटीत स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची झेल घेण्याची क्षमता अप्रतिम होती. कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक 8 झेल घेण्याचा विश्वविक्रमही त्याच्याच नावावर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या 2015 च्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. त्याने 8 पैकी 6 झेल हे फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर पकडले होते. गेल्या वर्षी त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर स्लिपमधील झेल सोडण्याचा सपाटा सुरू झाला.

Virat Kohli Dropping Catches
Dinesh Karthik : समालोचक दिनेश कार्तिकची भविष्यवाणी ठरली खरी; मार्क वॉ हरला DK जिंकला!

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 हून अधिक झेल सोडले आहेत. या कसोटीपूर्वी विराटने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 99 झेल सोडले होते. या सामन्यात त्याने तीन झेल सोडले. या सामन्यापूर्वी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 396 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 295 झेल आहेत. क्रिकेटच्या इतिहासात एक क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो सातव्या क्रमांकावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.