Virat Kohli : 'विराट' RCB समोर MI पालापाचोळ्यासारखी उडाली; रोहितचे येरे माझ्या मागल्याच!

Virat Kohli RCB vs MI IPL 2023
Virat Kohli RCB vs MI IPL 2023 ESAKAL
Updated on

Virat Kohli RCB vs MI IPL 2023 : तिलक वर्माच्या 84 धावांच्या खेळीमुळे मुंबईने आरसीबीविरूद्ध फाईट बॅक केले असे वाटत होते. मात्र विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने मुंबई फॅन्सच्या या आशेवर पाणी फेरले. मुंबईचे 172 धावांचे आव्हान आरसीबीने 16.2 षटकात 8 गडी राखून पार करत मोठा विजय मिळवला. ज्या पद्धतीने विराट आणि ड्युप्लेसिसने सुरूवात केली ते पाहते ते आरामात सामना जिंकू शकले असते. मात्र या दोघांनी दूरदृष्टी दाखवत सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून चांगल्या धावगतीचा पुढे क्वालिफायरसाठी फायदा होईल.

विराट कोहलीने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची तुफानी खेळी केली. तर ड्युप्लेसिसने 43 चेंडूत 73 धावा चोपल्या. या दोघांनी 148 धावांची दमदार सलामी दिली. मुंबई इंडियन्ससाठी गेला हंगाम अत्यंत खराब गेला होता. यंदाच्या हंगामात त्यांच्याकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती मात्र आजच्या सामन्यात ना त्यांची फलंदाजी चांगली झाली ना गोलंदाजी.

Virat Kohli RCB vs MI IPL 2023
Suryakumar Yadav : इम्पॅक्टच नाही! रोहितने 16 चेंडूत 15 धावा करणाऱ्या सूर्याला बसवले कट्ट्यावर

मुंबई इंडियन्सने अखेरच्या काही षटकात झुंजार खेळी करत 171 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर सामना रंगतदार होईल असे वाटत होते. मात्र आरसीबीने आपल्या घरच्या चाहत्यांसमोर दमदार सुरूवात केली.

सलामीवीर विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिस यांनी पहिल्या 9 षटकातच 80 धावा चोपल्या. ड्युप्लेसिसने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर आरसीबीने 10 षटकात शंभरी देखील गाठली.

विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी आपला तडाखा 10 व्या षटकातनंतरही कायम ठेवला. दरम्यान, विराट कोहलीने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. फाफ ड्युप्लेसिसने देखील आपला गिअर बदलला होता. असे वाटले की हे दोघेच 15 व्या षटकापर्यंतच 172 धावा करतील.

Virat Kohli RCB vs MI IPL 2023
Rohit Sharma : कार्तिक - सिराजची झाली टक्कर तरीही रोहितला उठवता आला नाही फायदा

मात्र 15 षटकात 148 धावांची सलामी देणारी ही जोडी अखेर अर्शद खानने फोडली. त्याने ड्युप्लेसिसला 73 धावांवर बाद केले. पाठोपाठ दिनेश कार्तिक देखील शुन्यावर ग्रीनला विकेट देऊन बसला. या पाठोलाठ पडलेल्या दोन विकेट्सनंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 48 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. त्याला दोन षटकार मारत 3 चेंडूत 12 धावा करणाऱ्या मॅक्सवेलने विजयापर्यंत साथ दिली. या दोघांनी आरसीबीचा विजय 16.2 षटकातच साकारला.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामन्यात आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेमध्येच आरसीबीच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था 3 बाद 20 धावा अशी केली. इशान किशन 10, रोहित शर्मा 1 तर ग्रीन 5 धावा करून पॅव्हेलियनच्या वाटेला लागले होते.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवला देखील फारशी मोठी खेळी करता आली नाही. तोही 16 चेंडूत 15 धावा करून माघारी फिरला. मुंबईचे रथी महारथी ढेर होत असताना एकटा तिलक वर्मा एका बाजूने लढत होता. सुरूवातीला सावध पवित्र्यात असलेल्या तिलकने नंतर आपली धावगती वाढवली.

त्याला वधेराने 21 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई शंभरीच्या जवळ पोहचला. मात्र मोक्याच्या क्षणी वधेरा त्याने टीम डेव्हिडने तिलक वर्माची साथ सोडली. मात्र तिलक वर्माने आपला झुंजारपणा सोडला नाही. तिलक वर्माने शेवटच्या दोन षटकात 38 धावा चोपून काढत मुंबईला 171 धावांपर्यंत पोहचवले. त्याला सिराजने एकाच षटकात 5 वाईड टाकून चांगली साथ दिली. तिलक वर्माने 46 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.