VIDEO : विराटचे 7 पर्याय! तो चेंडू पॅडला लागला असता तर... झोपण्यापूर्वी अश्विनच्या अंगावर येतो काटा

विराटनं एक चेंडू खेळण्यासाठी 7 पर्याय दिले, तो वेगळ्याच जगात होता.... अश्विनने सांगितला भन्नाट किस्सा
 Virat Kohli  | R Ashwin
Virat Kohli | R Ashwin
Updated on

Virat Kohli R Ashwin : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. या विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारा भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबाद मध्ये होणार आहे.

सर्वत्र त्या सामन्यांची चर्चा सुरू आहे, यादरम्यान आर अश्विनचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अश्विनने त्या शेवटच्या चेंडूआधी विराट कोहलीमध्ये आणि त्याच्यात काय घडले, मानसिकदृष्ट्या हा कसा जिंकला याचा खुलासा केला आहे.

 Virat Kohli  | R Ashwin
World Cup 2023 : ICC वर्ल्ड कपवरुन रोहित पवार राष्ट्रवादीच्या 'त्या' बड्या नेत्याशी भिडले

ICC सोबतच्या संभाषणात भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने सांगितले की, जेव्हा तो हजारो लोकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्यावर टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी दबाव होता, तोही पाकिस्तानविरुद्ध. ही घटना 2022 च्या टी-20 विश्वचषकाची आहे. जिथे भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि आर अश्विन स्ट्राइकवर होता.

अश्विनने सांगितले की, 'जेव्हा शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला, तेव्हा मला त्याच्यावर खूप राग आला होता. त्याच्यामुळे मला सर्वात कठीण काम करावे लागले. जेव्हा मी क्रिजवर गेलो तेव्हा लोकांचे आवाज ऐकून समजले की ही किती मोठी संधी आहे.

 Virat Kohli  | R Ashwin
Team India : 4 खेळाडूंना IPL मधील चूक पडणार महागात, BCCI कडे तक्रार, वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर?

कोहलीने चेंडू खेळण्यासाठी दिले सात पर्याय

अश्विनने सांगितले की, कोहलीने त्याला एक चेंडू खेळण्यासाठी सात पर्याय दिले होते. तो शॉट मी खेळू शकलो असतो, तर मी आठव्या क्रमांकावर थोडासा फलंदाजीला आलो असतो. कोहलीच्या डोळ्यात जोश होता. त्याच वेळी, शेवटचा चेंडू मोहम्मद नवाजने वाइड बॉल टाकला, तेव्हा मला माहित होते की मी स्पर्धा जिंकली आहे, क्रिकेट अनेक प्रकारे खूप संदेश देणार आहे. जिथे मला सकारात्मकता परत मिळाली.

अश्विनने सांगितले की, कधी कधी झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर तो व्हिडिओ पाहतो त्यावेळी मी त्या एका चेंडूचा विचार करतो, तो चेंडू पॅडला लागला असता तर काय झाले असते. मात्र हा सामना आपल्याच हातात संपवण्यासाठी लिहिल्याचं त्याला आता वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.