Virat Kohli Haris Rauf : आशिया कप 2023 मध्ये आत दोन बलाढ्य संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेत लढत होणार आहे. या लढतीपूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांनी पल्लिकेले येथील कँडी स्टेडियमवर एकत्र सराव केला. (Asia Cup 2023 India Vs Pakistan)
या सरावादरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील स्टार खेळाडूंचा ब्रोमान्स पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्पीडस्टार हारिस रौऊफ यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. गेल्यावेळी भारत पाकिस्तान एकमेकांना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भिडले होते. त्यावेळी विराट कोहलीने हारिस रौऊफ ज्या वेगाने गोलंदाजी करतो त्याच वेगाने त्याची धुलाई देखील केली होती.
आशिया कप 2023 मधील भारत आपला पहिला सामना आज श्रीलंकेतील कँडी स्टेडियमवर खेळणार आहे. भारत आशिया कपची सुरूवातच पाकिस्तानविरूद्ध करणार असल्याने या सामन्याकडे भारतातीलच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.
भारत - पाकिस्तान सामना म्हटलं तर दोन्ही बाजूनी कट्टरता ही येतेच मात्र रोहित शर्माने सामन्यापूर्वीच स्पष्ट केले की ही कट्टरता लोकांच्या चर्चेचा विषय असेल मात्र आम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही.' '
दरम्यान, कँडी येथील सामन्यापूर्वी फ्लड लाईट्समध्ये सराव करण्यासाठी भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघ मैदानात एकत्र आले होते. त्यावेळी विराट कोहली आणि हारिस रौऊफची भेट झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत हारिस रौऊफ म्हणतोय की 'जिथून जातोय तिथे फक्त कोहली - कोहलीच ऐकू येत आहे.'
टी 20 वर्ल्डकप 2022 च्या मेलबर्नमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने हारिस रौऊफला सलग दोन षटाकर मारत सामन्याचा नूरच पालटला होता. भारत त्यावेळी पाकिस्तानचे 160 धावांचे टाग्रेट चेस करत होता.
हारिस रौऊफ कायम एक किस्सा सांगतो, तो भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींबाबत म्हणतो की, 'ज्या ज्यावेळी मी रवी शास्त्रींना भेटतो त्या त्यावेळी ते मला म्हणतात की, दोस्ता ज्यावेळी तू आमच्याकडे आलास त्यावेळी तू नेट बॉलर होतास... आणि आता तू जागतिक स्तरावर गोलंदाजी करत आहे. तू जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमवलं आहेस. ज्यावेळी आम्ही तुला पाहतो त्यावेळी खूप आनंंद होते. विराट कोहली देखील तुझी स्तुती करत असतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.