Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण

IND vs ENG Test Series News :
IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathisakal
Updated on

India vs England Test Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयने त्याला संघातून वगळण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
Rohit Sharma : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला रोहितची अनुपस्थितीत; हैदराबादमध्ये पोहचून केला सराव?

विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिले दोन कसोटी सामने खेळणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. विराटच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र हैदराबाद कसोटी सामन्यापूर्वी त्याची घोषणा होऊ शकते. याआधी कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातूनही माघार घेतली होती.

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले की, "विराट कोहलीने वैयक्तिक कारण सांगून इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे. बीसीसीआय त्यांच्या या निर्णयाचा आदर करते.

IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
IPL 2024 Schedule : टीम इंडियाची घोडी पुन्हा दमणार... वर्ल्ड कपच्या फक्त 5 दिवस आधी आयपीएल संपणार?

बीसीसीआयने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांवरून अंदाज लावणे टाळावे. निवड समिती लवकरच त्याच्या बदलीच्या नावाची घोषणा करणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद कुमार सिराज, मोहम्मद कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.