Virat Kohli IND vs ENG : भारतीय संघाला बसणार मोठा झटका, विराटबाबत आली मोठी अपडेट?

Virat Kohli IND vs ENG
Virat Kohli IND vs ENG esakal
Updated on

Virat Kohli IND vs ENG : बीसीसीआयने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित केला होता. आता पुढच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित करायचा आहे. मात्र खेळाडूंच्या अपलब्धतेबाबत निवडसमितीसमोर अनेक प्रश्न आहेत. विराट कोहलीने ऐनवेळी मालिकेतून माघार घेतली. तो तिसऱ्या कसोटीत खेळेल अशी आशा व्यक्त केली जात होती.

Virat Kohli IND vs ENG
Sports Streaming App : क्रीडा क्षेत्रातातही युतीचे वारे! तीन बड्या कंपन्यांचा मोठा 'डाव'

मात्र मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली हा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीला देखील मुकण्याची शक्यता आहे. तो पाचव्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत देखील शाश्वती नाहीये. विराटने मालिका सुरू होण्यापूर्वीत कौटुंबिक कारणामुळे मालिकेतून माघार घेतली होती.

Virat Kohli IND vs ENG
Babar Azam Captaincy : बाबर आझम पुन्हा होणार पाकिस्तानाचा कर्णधार; पीसीबी घेणार यू टर्न?

उर्वरित तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा गुरूवारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कसोटीसाठी विराट कोहली संघात परतणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. मात्र विराटबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली सध्या विदेशात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडने संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्क करून त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेणार असल्याचे संकेत दिले होते.

विराट सोबतच केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या उपलब्धतेबातात देखील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या दोघांपैकी निदान एक जण किंवा दोघेही उर्वरित कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असतील. दोघांच्याही फिटनेसबाबतचे चित्र आशावादी आहे.

जसप्रीत बुमराह देखील तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती घेणार नसून तो खेळण्याची शक्यता आहे. तसेच विश्रांती दिलेला मोहम्मद सिराज देखील तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.