Virat Kohli Instagram: विराट कोहलीने एका रात्रीत गमावले लाखो फॉलोअर्स

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला 22 कोटी लोक फॉलो करतात
Virat Kohli
Virat KohliEsakal
Updated on

विराट कोहलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. इंस्टाग्रामवर द्विशतक ठोकत विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोशल मीडिया याचा ताजा पुरावा आहे. सध्या कोहलीच्या बॅटमधून शतक किंवा द्विशतक मैदानावर दिसत नसले तरी विराटने दुहेरी शतक झळकावून इंन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नक्कीच वाढवले . आता विराटने या सोशल मीडिया साइटवर 22 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे 22 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.

काही दिवसपूर्वी सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राममध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. याचा फटका इन्स्टाग्राम युजरला बसला. पण याचा जास्त फटका विराटलाही बसला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे त्याचे लाखो फॉलोअर्स कमी झाले आहेत. याशिवाय या तांत्रिक बिघाडामुळे लोकांना त्यांचे खाते व्यवस्थित पाहता आले नाही. त्याच वेळी, वापरकर्त्यांना पोस्ट आणि मेसेज पाहण्यात समस्यांचा सामना करावा लागला. इंस्टाग्रामने आता ही समस्या दूर केली असली तरी, विराट कोहलीला गमावलेले फॉलोअर्स परत मिळाले नाहीत, जे तांत्रिक बिघाडामुळे त्याला गमवावे लागले.

Virat Kohli
Virat Kohli : एकटा विराटच! भारताचे फक्त 4 फलंदाज दुहेरी आकड्यात

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला 22 कोटी लोक फॉलो करतात. माजी भारतीय कर्णधार हे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय व्यक्तिमत्त्व आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामने ट्विट केले की तांत्रिक समस्या दूर झाली आहे. दरम्यान, इंस्टाग्रामने ट्विट करून सांगितले की, आम्हाला या समस्येवर उपाय सापडला आहे. यामुळे जगाच्या विविध भागांतील लोकांना त्यांचे अकाउंट पाहण्यात अडचणी आल्या, तसेच अनेक लोकांचे फॉलोअर्स कमी झाले. यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने तांत्रिक बिघाड कशामुळे झाला हे स्पष्ट केले नाही. वास्तविक, ऑक्टोबर महिन्यात मेटा कंपनीला मोठ्या तांत्रिक समस्येला सामोरे जाण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी तांत्रिक बिघाडाची तक्रार केली होती.

Virat Kohli
Virat Kohli : विक्रम मोडला! किंग कोहली आता टी 20 वर्ल्डकपमधील 'राजा'माणूस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.