पाकव्याप्त काश्मीरमधील लीग खेळण्यासाठी विराट कोहलीला निमंत्रण?

Virat Kohli May Invite For Pak Occupied Kashmir Premier League
Virat Kohli May Invite For Pak Occupied Kashmir Premier Leagueesakal
Updated on

विराट कोहली आज सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. काही सूत्रांनी दिलेल्या वृत्तामुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये काश्मीर प्रीमियर लीग 2022 चे (Kashmir Premier League 2022) आयोजन करण्यात येणार आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी विराट कोहलीला (Virat Kohli) निमंत्रण देण्याची योजना आखली जात आहे. सोशल मीडियावर याबाबतची बातमी वाऱ्यासारखी परसरली. काही जणांच्या मते पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ (Rashid Latif ) विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये बोलवण्यास इच्छूक आहे. लतीफ काश्मीर प्रीमियर लीगचे कार्यकारी संचालक झाले आहेत. दरम्यान, काश्मीर हा भारतासाठी खूप संवेदनशील विषय आहे. असे असताना देखील राशिद लतीफच्या बाबतीत अशी बातमी आल्याने चर्चा तर होणारच. मात्र ज्यावेळी चर्चा जोर धरू लागली त्यावेळी राशिद लतीफने यापासून आपले अंग काढून घेतले.

Virat Kohli May Invite For Pak Occupied Kashmir Premier League
निखात झरीन नावाचं वादळ पोहचलं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

राशिद लतीफ म्हणाले की, 'मी विराट बाबत काही बोललो नाही. आमचे बॉस आरिफ मलिक यांनी काल संध्याकाळी हा विषय काढला होता. त्यांच्या मते विराट कोहलीला लीग खेळायला निमंत्रण देऊ या तो येईल न येईल ही त्याची मर्जी. हा प्रस्ताव आरिफ मलिक यांनी ठेवला होता. हा त्यांचा विचार होता.'

Virat Kohli May Invite For Pak Occupied Kashmir Premier League
छोट्या मुशफिकूरचे मोठे रेकॉर्ड; असं करणारा ठरला पहिला बांगलादेशी

आरिफ मलिक काश्मीर प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. लतीफने स्पष्टीकर देताना सांगितले की त्यांचा उद्येश हा दोन्ही देशांमध्ये चांगले नाते निर्माण व्हावे हा आहे. मात्र एक भारतीय खेळाडू पाकव्याप्त काश्मीरमध्ये खेळण्यासाठी का जाईल याचा विचार लतीफ आणि आरिफ मलिक यांनी केला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काश्मीर प्रीमियर लीगची सुरूवात गेल्या वर्षी झाली होती. या लीगमध्ये 6 संघांनी भाग घेतला होता. या लीगमध्ये भाग घेणारा हर्षल गिब्ज हा पहिला आणि एकमेव विदेशी खेळाडू होता. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.