Video : Ind-Pak सामन्यापूर्वी विराट-बाबरची भेट, चाहत्यांमध्ये वातावरण तापले

सामन्यापूर्वी विराट कोहली आणि बाबर आझमची अशी भेट चाहत्यांनी पाहिली, त्यानंतर सोशल मीडियावरही खळबळ उडाली
Virat Kohli Meets Babar Azam video
Virat Kohli Meets Babar Azam videosakal
Updated on

Virat Kohli Meets Babar Azam video : आशिया कप सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. आशियातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. या हायव्होटेज सामन्यापूर्वी विराट कोहलीने बाबर आझमची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया दुबईला पोहोचली आहे. या दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अनेक खेळाडूंची भेट घेतली. किंग कोहलीने बाबरची भेट घेऊन हस्तांदोलन केले. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर वातावरण तापले. सामन्यापूर्वी विराट कोहली आणि बाबर आझमची अशी भेट चाहत्यांनी पाहिली, त्यानंतर सोशल मीडियावरही खळबळ उडाली. यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करू लागले. एका यूजरने लिहिले की, कोहली साहेबांना भेटल्यानंतर बाबर आझमला धक्का बसला आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.