IND vs NZ: विसरभोळा रोहित! विराट कोहलीचा जुना व्हिडिओ व्हायरल; चर्चेला उधाण

Virat Kohli Old Video Viral
Virat Kohli Old Video Viral
Updated on

Virat Kohli Old Video Viral : विराट कोहली आणि रोहित शर्मा  खूप जवळचे मित्र आहेत. त्यांना एकमेकांबद्दल खूप माहितीही आहे. अलीकडेच रोहितसोबत एक ब्रेन फेड मोमेंट पाहिला मिळाला, त्यानंतर आता विराट कोहलीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट रोहितला विसरभोळा सांगत आहे.

Virat Kohli Old Video Viral
KL Rahul Wedding: लग्नाला या पण फोन घरीचं ठेवा... राहुल-आथियाचं नवं फर्मान

व्हायरल व्हिडिओ कोहलीच्या जुन्या मुलाखतीचा आहे. रोहित शर्मा विषयी बोलताना कोहलीने सांगितले की तो अनेकदा त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी विसरतो. रोहित जितका विसरतो तितका मी कोणीही विसरलेला पाहिला नाही. आयपॅड, वॉलेट, फोन… म्हणजे छोटी कामं नसून रोजच्या वापरातल्या मोठमोठ्या गोष्टींचाही अनेकदा विसरतो, घेता येतील नवीन म्हणत असतो. कधीकधी त्याला अर्ध्या आल्यावर कळते की त्याचा आयपॅड विमानातच राहिला होता.

Virat Kohli Old Video Viral
IND vs NZ: रोहित शर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरला मियादादला टाकलं मागे! काय आहे कारण

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करायची की गोलंदाजी हेच विसरला होता. तब्बल 15 सेकंद विचार केल्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर लोक त्याला गजनी म्हणत आहेत. 

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडेबद्दल बोलायचे झाले तर, येथे भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर न्यूझीलंडने 34.3 षटकात फक्त 108 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने रोहित (51) आणि शुभमन गिल (40) यांच्या खेळीच्या जोरावर अवघ्या 20.1 षटकांत 109 धावांचे लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.