विराट लकी नंबरवरच अडला; कव्हर ड्राईव्हने केला घात

Virat Kohli once Again out playing cover drive on out side off stump ball during India vs West Indies 2nd ODI
Virat Kohli once Again out playing cover drive on out side off stump ball during India vs West Indies 2nd ODIesakal
Updated on

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) अपयशी ठरला आहे. तो आपला जर्सी क्रमांका एवढ्या म्हणजे 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पुन्हा एकदा बाहेरच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह (Cover Drive) खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट देऊन बसला. विराट कोहली बाद झाला त्यावेळी भारताच्या 43 धावा झाल्या होत्या. (Virat Kohli Once Again Out Playing Cover Drive On Out Side Off Stump)

Virat Kohli once Again out playing cover drive on out side off stump ball during India vs West Indies 2nd ODI
IND vs WI 2nd ODI : प्रसिद्ध कृष्णाचा चौका; अन् बरंच काही

दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील सर्वांना आश्चर्याचा धक्का देत संघात परतलेल्या केएल राहुल ऐवजी ऋषभ पंतला सलामीला घेऊन आला. मात्र हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर ऋषभ पंतही (Rishabh Pant) पॅव्हेलियनमध्ये परतले.

आता भारतीय संघाची सर्व मदार भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर होती. तो देखील सावध फलंदाजी करत सेट होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो 18 धावांवर पोहचला असतानाच त्याला ओडेन स्मिथने बाद केले. विराट कोहली स्मिथच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याच्या नादात होता. मात्र चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन विकेटकिपर शाय होपच्या ग्लोजमध्ये विसावला.

Virat Kohli once Again out playing cover drive on out side off stump ball during India vs West Indies 2nd ODI
IND vs WI 2nd ODI : नवा प्रयोग, रोहितसोबत पंत ओपनिंगला; पण...

विराट कोहलीला गेल्या दोन वर्षापासून मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. तो सातत्याने बाहेरचा चेंडू खेळण्याच्या नादात बाद होतोय. यावरून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. आजच्या मालिका विजयासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात देखील विराट कोहली नेहमीच्या पद्धतीनेच बाद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.