Virat Kohli One8 Commune : विराटनं रेस्तराँ चेन सुरू केली मात्र त्याचा सचिन अन् सेहवाग तर होणार नाही ना?

Virat Kohli One8 Commune Restaurant Chain
Virat Kohli One8 Commune Restaurant Chainesakal
Updated on

Virat Kohli One8 Commune Restaurant Chain : विराट कोहलीने आपल्या रेस्तराँ Virat Kohli’s One8 Commune ची शाखा नुकतीच मुंबईत उघडली. यापूर्वी त्याच्या One8 च्या पुणे, कोलकाता आणि दिल्लीत शाखा होत्या. विराटच्या मुंबईतील रेस्तराँचा रिव्ह्यू सध्या तीर चांगला आला आहे. मात्र यशस्वी क्रिकेटपटू आहे म्हणून यशस्वी रेस्तराँ व्यावसायिक होऊ शकतोच असे नाही. यापूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या व्यवसायात आपला हात आजमावला आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणेच यशस्वी झाली आहेत. इतर सर्वांना आपला गाशा गुंडळून पॅव्हेलियनची वाट धरावी लागली आहे.

Virat Kohli One8 Commune Restaurant Chain
Glenn Phillips : न्यूझीलंडच्या फिलिप्सने 'मंकडिंग' चुकवण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; VIDEO व्हायरल

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, अजय जडेजा, सौरभ गांगुली हे रेस्तराँच्या खेळपट्टीवर फारसा टिकाव धरू शकले नाहीत. यातील सर्वाना आपले रेस्तराँ बंद करावे लागले. ही इतकी अयशस्वी उदाहरणे असताना देखील विराट कोहलीने या व्यवसायात उडी घेतली आहे.

सचिन तेंडुलकरने 'तेंडुलकर्स' नावाने एक रेस्तराँ मुंबई आणि बेंगलोरमध्ये सुरू केलं. मात्र ही रेस्तराँ 2007 मध्ये बंद करावी लागली. जरी क्रिकेटपटूंसाठी त्यांचे चाहते रांगेत उभे राहत असले तरी ते त्यांच्या रेस्टराँपुढेही रांगा लावून उभे राहतीलच असे नसते. सौरव गांगुलीने 2004 मध्ये कोलकात्याच्या पार्क स्ट्रीट या पॉश भागात रेस्तराँ सुरू केले मात्र दादाची ही इनिंग 2011 मध्ये संपुष्टात आली. यावेळी सौरव आणि त्याचा भाऊ स्नेहाशिष यांना वेळ नसल्याने रेस्तराँकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ते बंद करावे लागले असे सांगण्यात आले.

सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत विरेंद्र सेहवागने देखील दिल्लीत हा प्रोयग केला. मात्र हा प्रयोग इतका फसला की सेहवाग आपल्या पार्टनरविरूद्ध कोर्टात देखील गेला. माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने देखील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवासोबत दिल्लीत इटालियन रेस्तराँ सुरू केलं. मात्र हे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात अयशस्वी ठरले. रविंद्र जडेजाने देखील राजकोटमध्ये हा प्रयोग करून पाहिला. विराट कोहलीच्या दिल्लीत शाखेला. असंतुष्ट ग्राहक आणि कोरोनाचाही फटका बसला.

Virat Kohli One8 Commune Restaurant Chain
NZ vs SL : आशियाई शेर न्यूझीलंडपुढे ढेर! ग्रुप 1 मध्ये किवी अव्वल तर लंका पाचव्या स्थानावर

ही जरी अपयशाची उदाहरणे असली तरी काही क्रिकेटपटूंची रेस्तराँ आणि हॉटेल्स अजूनही तग धरून आहेत. यात 1983 चा वर्ल्डकपविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव आणि जहीर खान यांचा समावेश आहे. कपिल देव यांनी चंदीगडमध्ये कपिल हॉटेल म्हणून डिलक्स रेस्तराँ आणि हॉटेल सुरू केले. आता त्याचे नाव कप्तान रेस्तराँ असं झालं आहे. या हॉटेलमधील इलेव्हन्स रेस्तराँ हे कपिल देव यांच्या फेव्हरेट डिशेस सर्व्ह करतं. याचबरोबर थाई आणि चायनिज पदार्थ देखील तेथे मिळतात. कपिल देव यांनी उजून एक इलेव्हन्सची शाखा पटना येथे उघडली.

जहीर खानने रेस्तराँ क्षेत्रात 2005 मध्ये उडी घेतली. त्याने पुण्यात जहीर खान डाईन फाईन रेस्तराँ सुरू केलं. सध्या तरी जहीरचा हा रेस्तराँ स्पेल चांगला सुरू असून 2013 मध्ये त्याने पुण्यातच टॉस स्पोर्ट्स लाऊंड सुरू केलं. ही दोन्ही रेस्तराँ जहीर खान हॉस्पिटेलिटी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत समाविष्ट आहेत. स्मार्ट भज्जीने तर आपल्या आपल्या नावाची फ्रेंचायजी विकली. त्याने देखील भज्जी दा धाबा हे रेस्तराँ सुरू केलं होते मात्र ते म्हणावे तसे चालत नसलेले पाहून त्याने आपल्या नावाची फ्रेंचायची देण्यास सुरूवात केली.

Virat Kohli One8 Commune Restaurant Chain
Australia Weather : ऑस्ट्रेलियातील T20 वर्ल्डकप पाण्यात; इनडोअर स्टेडियमचं घोडं कुठं अडलं?

याबाबत ऑलिव्ह ग्रुप रेस्तराँचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक ए.डी. सिंग म्हणाले की, 'रेस्तराँमध्ये जाणं हे उत्साहवर्धक आणि आनंदी असते. सुरूवातीला तुमच्याकडे ग्राहक उत्साहानं आणि आनंदानं येतील. मात्र रेस्तराँ व्यवसाय हा पुन्हा पुन्हा ग्राहक येणे याच्यावरच चालतो. एकदा का त्यातील नाविन्यता संपली की ग्राहक पाठ फिरवायला सुरू करतात. रेस्तराँ हे त्यातील खाद्य पदार्थ, अॅम्बियन्स आणि लोकेशनवर अवलंबून असते. नुसते मोठे नाव असून उपयोग नाही. तुम्ही जर रेस्तराँमध्ये चांगले पदार्थ, वातावरण ठेवले नाही तर सेलिब्रेटी रेस्तराँ लगेचच रडारच्या बाहेर जातात. इथे वलय सर्वस्व नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.