Virat Kohli : मी तो शॉट खेळताना खूप... अखेर विराटने सांगितलंच 'तो' ऐतिहासिक फटका का खेळला?

Virat Kohli Fancy Revers Shot
Virat Kohli Fancy Revers Shot esakal
Updated on

Virat Kohli Fancy Revers Shot : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात विराट कोहलीने जरी सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडत सर्वात वेगाने 13000 वनडे धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असला तरी त्याने अजून एक खास गोष्ट या सामन्यात केली. (Virat Kohli Latest News)

आतापर्यंत विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत कधी रिव्हर्स स्विप काय स्विप शॉट देखील खेळलेला नाही. मात्र त्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात फिरकीपटूला नाही तर थेट वेगवान गोलंदाजाला रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या फटक्यावर विराट कोहलीला चौकार देखील मिळाला. (India Vs Pakistan Cricket)

Virat Kohli Fancy Revers Shot
India Vs Pakistan : कुलदीपचा ड्रीम स्पेल! भारताचा पाकिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा वनडे विजय

विराट कोहलीला त्याच्या तडाखेबाज 122 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यावेळी या फक्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विराट कोहलीने हा फटका आपण का खेळला याचे कारण सांगितले. (Asia Cup 2023 Latest News)

विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला की, 'मी ही मुलाखत छोटी ठेवण्याची विनंती करतोय काण मी खूप थकलेलो आहे. तो पुढे म्हणाला, मी वेगवेगळ्या पद्धतीने संघाला मदत करण्यासाठी कायम तयार असतो. आज केएल राहुलने दमदार सुरूवात केली. त्यावेळी माझी भुमिका फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची होती. मी कायम एकेरी आणि दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न करत असतो.'

विराटला त्याने मारलेल्या रिव्हर्स फटक्याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला, 'तो फटका मी फक्त शतक पूर्ण केलं होतं म्हणून मारू शकलो. त्या फटक्याबद्दल मला थोडा आदर आहे. मी असे फटके चांगल्या पद्धतीने खेळत नाही. तो फटका खेळताना मी खूप वाईट दिसतो.'

Virat Kohli Fancy Revers Shot
Shreyas Iyer Fitness : केएलनं शतक ठोकलं... फिटनेस दाखवून दिला तरी NCA वर लोकं का जाळ काढत आहेत?

विराट पुढे म्हणला की, 'मी आणि केएल राहुल हे खूप पठडीतले खेळाडू आहोत. आम्हाला फार फॅन्सी फटके मारता येत नाहीत. मात्र आम्ही चांगल्या क्रिकेटिंग शॉट्समधून चांगल्या धावा करू शकतो. ती एक चांगली भागिदारी होती. हा भारतीय क्रिकेटसाठी चांगला संकेत देखील आहे.'

'राहुलने ज्या प्रकारे वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे ते पाहून मी आज त्याच्यासाठी खूप खूष आहे. मला त्या चोरट्या धावा घेण्यात मजा येत होती मात्र मी उद्या आपल्याला दुपारी 3 वाजता पुन्हा खेळायचं आहे याचा देखील विचार करत होतो.'

'आम्ही कसोटी खेळाडू असल्याने, जवळपास 100 कसोटी खेळण्याने आम्हाला लवकर रिकव्हर करून पुढच्या दिवसासाठी तयार राहण्याची सवय आहे. मैदानावरील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक कारण त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आम्ही सामना खेळू शकलो.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.