IND vs ENG : विराट कोहलीने आईमुळे कसोटी मालिकेतून घेतली माघार...; काय आहे व्हायरल बातमीमागील सत्य?

IND vs ENG Virat Kohli
IND vs ENG Virat Kohlisakal
Updated on

Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा चौथ्या दिवशी 28 धावांनी पराभव झाला. विराट कोहली या भारतीय संघाचा भाग नव्हता. तसेच माजी कर्णधार विशाखापट्टणम कसोटीतही खेळणार नाही.

खरंतर, ही मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून माघार घेतली होती. मात्र, विराट कोहलीने नाव का मागे घेतले हे स्पष्ट झाले नाही. त्यानंतर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, विराट कोहलीची आई आजारी आहे. त्यामुळे त्याने माघार घेतली. आता त्याचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आईच्या तब्येतीची बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

IND vs ENG Virat Kohli
Mayank Agarwal Health Update : मयंक अग्रवालला ४८ तास बोलता येणार नाही ? विषप्रयोगाच्या आरोपानंतर समोर आली मोठी अपडेट

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी माझ्या आईच्या प्रकृतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक बातम्या येत आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी आई पूर्णपणे बरी आहे. माझ्या आईच्या तब्येतीबद्दलच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत अशा बातम्या पसरवू नका.

विराट कोहली आता तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता, या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.

या सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीची उणीव जाणवत होती. टीम इंडियाला दुसऱ्या डावात 231 धावा करता आल्या नाहीत. याशिवाय स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकही विराट कोहलीला खूप मिस करत होते. अनेक प्रेक्षक स्टेडियममध्ये विराट कोहलीचे नाव असलेली जर्सी घालून बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.