अयोध्येत होणाऱ्या नव्या राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली अयोध्येत दाखल झाला आहे असा काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीचा ताफा शहरात दाखल होत असल्याचे दाखवले जात आहे. मात्र या व्हिडिओची पडताळणी अजून झालेली नाही.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला विराट कोहलीसोबतच कर्णधार रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुल, विरेंद्र सेहवाग, आर अश्विन, हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रण दिलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. हैदराबाद येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणारअसून विराट कोहली देखील हैदराबाद येथे सराव सत्रासाठी उपस्थित होता. (Virat Kohli was practicing in Hyderabad)
दरम्यान, बीसीसीआयने विराट कोहलीला अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी एक दिवसाची सुट्टी दिली होती. विराट कोहलीला अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेवेळीच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते.
विराट कोहलीच्या आधी अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद देखील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला अयोध्येत पोहचले आहेत. सचिन तेंडुलकर आणि रविंद्र जडेजा देखील अयोध्येत पोहचल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आयोध्येत पोहचल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने व्हिडिओला जय श्री राम असं कॅप्शन दिलं होत. हरभजन सिंग हा आम आदमी पार्टीचा राज्यसभेचा खासदार आहे. त्याने पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता तो राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावत आहे. (Harbhajan Singh shared the video)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.