Virat Kohli : पाकिस्तानची ठासुन एका महिना झाल्यानंतर कोहली झाला भावनिक; "तो दिवस मी...''

पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता..
Virat Kohli
Virat Kohlisakal
Updated on

Virat Kohli Against Pakistan T20 World Cup : टी-20 विश्वचषक संपून 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुरू झालेला टी-20 विश्वचषक 13 नोव्हेंबरला संपला. फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडचा संघ दुसऱ्यांदा टी-20 मध्ये विश्वविजेता बनला. ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला. मात्र, सुपर-12 च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाची कामगिरी दमदार होती. भारताने पाचपैकी चार सामने जिंकले होते आणि सर्वाधिक आठ गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते.

Virat Kohli
Sania Mirza Viral Post: नवीन पोस्टमध्ये सानिया पुन्हा रडली; घटस्फोट सस्पेन्समध्ये!

टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली होती. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेला. एका महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता.

Virat Kohli
IND vs NZ : पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल! कॅप्टन धवन 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता ?

पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्याची आठवण करून कोहलीने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर लिहिले की, ''23 ऑक्टोबर 2022 माझ्या हृदयात नेहमीच खास असणार आहे. क्रिकेटच्या खेळात इतकी ऊर्जा यापूर्वी कधीच जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती.'' कोहलीने मेलबर्नमध्ये जवळपास 90,000 प्रेक्षकांसमोर 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली आणि टीम इंडियाचा विजय झाल्यावरच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. या खास खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

त्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. त्याने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताची फलंदाजी ढासळली. केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी चार धावा करू शकले. त्याचवेळी सूर्यकुमार यादव 15 धावा करू शकले. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने 113 धावांची भागीदारी केली. हार्दिक 40 धावा करून बाद झाला. तर कोहली शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हरिस रौफला सरळ षटकार ठोकला. कोहलीने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.