Bangladesh Vs India 2nd Test Virat Kohli Rishabh Pant : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या गोलंदाजांनी पहिले सत्र गाजवले. त्यांनी भारताचे दोन सलामीवीरांसह तीन फलंदाज बाद केले. त्यामुळे आता भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी ही विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यावर आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर असा काही गोंधळ झाला की विराट कोहली पंतवर जाम भडकला. परंतु विराट कोहलीने यावेळी पंतवर आरडाओरडा केला नाही तर फक्त नजरेतून आपल्या सर्व भावना पोहचवल्या. विराटची ती नजर पाहून पंत देखील गार झाला.
भारताने दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव बिनबाद 19 धावांपासून पुढे सुरू केला. मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने आधी केएल राहुलला 10 धावांवर त्यानंतर शुभमन गिलला 20 धावांवर पायचीत बाद करत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिला सेशन खेळून काढण्याच्या इराद्याने भागादारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताला 73 धावांवर पोहचवले असतानाच तैजुलने ही जोडी फोडली. त्याने पुजाराला 24 धावांवर बाद केले.
पुजारा बाद झाल्यानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या विराटला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानावर आला. या दोघांनी पहिल्या सत्रातील उरलेली सहा षटके जवळपास खेळून काढली. मात्र सत्राच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने मिडऑनला एक फटका मारला. तो चोरटी धाव घेण्यासाठी धावला. मात्र पंतने फिल्डरकडे पाहत विराट कोहलीला सिंगल घेण्यासाठी नकार दिला. यामुळे विराटला अर्ध्या वाटेतून माघारी फिरावे लागले. विराट कोहलीने डाईव्ह मारत क्रिज गाठवले. मात्र विराट धावबाद होता होता वाचला.
यानंतर विराटने पंतकडे रागने पाहिले सध्या सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर लंच ब्रेक झाला. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.