Team India : गौतम गंभीरला आपला आदर्श मानणाऱ्या 'या' खेळाडूचे करिअर कोहलीने केले उद्ध्वस्त

Virat Kohli and Gautam Gambhir
Virat Kohli and Gautam Gambhir
Updated on

विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने टीम इंडियाला अनेक वेळा स्वबळावर विजय मिळवून दिला आहे. पण विराट कोहलीची गणना एक रागीट खेळाडूमध्ये केली जाते. कोहलीचा अनेक खेळाडूंसोबतच्या लाइव्ह मॅचदरम्यान वादही पाहायला मिळाला आहे.

Virat Kohli and Gautam Gambhir
हरारे स्पोर्ट्स क्लबला भीषण आग; वर्ल्ड कप क्वालिफायर मॅचसंदर्भात ICC ने घेतला मोठा निर्णय

सौरव गांगुली आणि गौतम गंभीर हे कोहलीचे सर्वात मोठे शत्रू मानले जातात. हेच कारण आहे की कोहलीला या दोघांना आवडणारे खेळाडू अजिबात आवडत नाहीत. कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा कर्णधार नितीश राणा त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता, तरीही कोहलीने त्याला भारतीय संघात संधी दिली नाही. यामागे गौतम गंभीर हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शेवटी काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहू.

Virat Kohli and Gautam Gambhir
IND vs WI : अप्रतिम फॉर्म... शतकांमागून शतकं... तरीही टी-20 मालिकेतुन गिल बाहेर?

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू असून हे दोन्ही खेळाडू एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत. दुसरीकडे नितीश राणा भारताच्या माजी खेळाडू गौतम गंभीर आणि सौरव गांगुली यांना आपला आदर्श मानतात. प्रत्येक मुलाखतीत गौतम गंभीरचे कौतुक करत राहतात आणि याच कारणामुळे विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात राणाला एकही संधी दिली गेली नाही. असे नितीशचे केले चाहत्यांचे मत आहे.

Virat Kohli and Gautam Gambhir
Team India : वीरेंद्र सेहवाग होणार टीम इंडियाचा चीफ सेलेक्टर? BCCI अधिकाऱ्याच्या 'या' वक्तव्याने खळबळ

एकदा IPL च्या एका सामन्यादरम्यान नितीश राणा आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना अनेक अपशब्द बोलले होते. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कोहली होता. राणाला संधी न मिळण्याचे हे देखील एक कारण असू शकते.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 105 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 28 च्या सरासरीने फलंदाजी करताना 99 डावात 2594 धावा केल्या आहेत. नितीश राणाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 18 वेळा अर्धशतकी खेळी खेळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.