Sachin and Virat Ram Mandir : राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी विराट अन् सचिन जाणार अयोध्येला?

Sachin and Virat Ram Mandir
Sachin and Virat Ram Mandiresakal
Updated on

Sachin and Virat Ram Mandir : भारताचे आजी - माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठपणा कार्यक्रमाला उपसस्थिती लावू शकतात. यासाठी हे दोन्ही खेळाडू अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.

वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.

जर या दोघांनीही आमंत्रण स्विकारून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तर क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारे पहिल्या दोन क्रमांकाचे फलंदाज एकाचवेळी एका धार्मिक कार्यक्रमात दिसतील. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण कार्य जवळपास पूर्ण झाले असून 22 जानेवारी 2024 ला प्राण प्रतिष्ठपणा करून हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येईल.

Sachin and Virat Ram Mandir
Umran Malik : स्पीडस्टारला अलगद उचलून बाहेर फेकलं... माजी क्रिकेटपटू निवडसमितीवर जाम भडकला

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळपास 8000 पाहुणे होणार सामील

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळपास 8000 पाहुणे देखील उपस्थित राहणार आहे. जानेवारी महिन्यात 2024 मध्ये पूर्ण होईल. रामललांच्या मूर्तीच्या उद्घाटन प्रसंगी अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असणार आहेत.

यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली याच्यासह अनेक लोकांचा समावेश असेल.

Sachin and Virat Ram Mandir
Abhimanyu Easwaran : 'मैं हार नहीं मानूंगा...', भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूच्या भावना व्यक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.