IND vs NZ : विराट म्हणतो; संघव्यवस्थापन नवे, संघाची मानसिकता तीच

द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील पहिल्या मालिका विजयानंतर विराट म्हणाला...
Virat Kohli
Virat Kohliesakal
Updated on

मुंबई : भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना ( IND vs NZ 2nd Test ) 376 धावांनी जिंकत आपला धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय साजरा केला. याचबरोबर भारताने 2 सामन्यांची मालिकाही जिंकली. कानपूर कसोटी न्यूझीलंड ड्रॉ करण्यात यशस्वी ठरली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी विराट कोहली ( Virat Kohli ) विश्रांतीनंतर परतला. भारताने दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा मिळवला. ( IND vs NZ )

Virat Kohli
IND vs NZ : मालिका विजय द्रविडसाठी डोकेदुखी; स्वतः सांगितले कारण

दरम्यान, भारताने मालिका विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli ) आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'आम्ही सफाईदार कामगिरी केली. तुम्ही प्रत्येक खेळाडूने कामगिरी करावी अशी अपेक्षा ठेवतो. पहिल्या कसोटीतही आम्ही चांगली कामगिरी केली होती. आम्ही पहिल्या सामन्यातील कामगिरीची चर्चा केली होती. न्यूझीलंडलने चांगल्या प्रकारे प्रतिकार केला. गोलंदाजांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. पण, कानपूर कसोटीत किवी फलंदाजांनी चांगला प्रतिकार करत सामना ड्रॉ केला. मुंबई कसोटीत चेंडू चांगला उसळी घेत होता. त्यामुळे वेगवान गोलंदाजांची चांगली साथ लाभली. त्यामुळे ही कसोटी जिंकण्याची आम्हाला चांगली संधी होती.' ( IND vs NZ )

Virat Kohli
Jasprit Bumrah Birthday : बुमराहचा बर्थडे; संजना झाली रोमँटिक

दरम्यान, विराट कोहलीने ( Virat Kohli ) राहुल द्रविड ( Rahul dravid ) आणि इतर सपोर्ट नवा सपोर्ट स्टाफ आल्यानंतर संघाची मानसिकता कशी आहे याबद्दलही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला 'जरी नवे संघ व्यवस्थापन आले असले तरी संघाची मानसिकता बदलली नाही. भारतीय क्रिकेटचा स्तर उंचावत ठेवणे आणि तो कायम उंचावत राहणे महत्त्वाचे आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा चांगले आव्हान आहे. आम्ही इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे. त्या अनुभवाचा फायदा आम्हाला ऑस्ट्रेलिया दैऱ्यावरही झाला होता हे आपण पाहिले. दक्षिण आफ्रिका दौरा हा आव्हानात्मक आहे. आम्हाला तेथे विजय मिळवायचा आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार दक्षिण आफ्रिकेत खेळू आणि मालिका जिंकू अशी आशा आहे.'

Virat Kohli
WTC_23_PointTable : पाकला तगडी फाईट; टीम इंडियाची टक्केवारी सुधारली

विराट कोहली ( Virat Kohli ) न्यूझीलंड विरुद्धची दुसरी कसोटी खेळला. ( IND vs NZ ) यात त्याने पहिल्या डावात शुन्य तर दुसऱ्या डावात 36 धावा केल्या होता. भारताने न्यूझीलंड विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमधील ( WTC ) गुणांच्या टक्केवारीत सुधारणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.