Video शेअर करत विराट म्हणाला, तुम्ही माझा प्रवास सुंदर केलात!

Virat Kohli Share Video after 100th test
Virat Kohli Share Video after 100th test esakal
Updated on

भारताने श्रीलंकेविरूद्धची पहिली कसोटी 222 धावांनी जिंकत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीची ही 100 वी कसोटी (Virat Kohli 100th Test) होती. टीम इंडियाने मोठा विजय साजरा करून विराटची ही 100 वी कसोटी स्मरणीय बनवली. दरम्यान, कसोटी सामना झाल्यानंतर विराट कोहलीने एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे आभार मानले.

Virat Kohli Share Video after 100th test
जडेजा द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना डाव का घोषित केला? रोहित म्हणाला..

विराट कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) फोटो देखील आहे. या व्हिडिओत विराट कोहली म्हणतो की, माझे कुटुंबीय, संघ सहकारी, प्रशिक्षक आणि बीसीसीआय यांचे आभार. तुम्ही हा प्रवास सुंदर केलात. आतापर्यंत आणि इथूनपुढेही! हा एक मोठा प्रवास होता. यात चढ उतारही होते आणि खूप शिकायला देखील मिळालं. 100 व्या कसोटीचं यापेक्षा चांगलं सेलिब्रेशन असूच शकत नाही. तुमच्या पाठिंब्यासाठी आभार.'

Virat Kohli Share Video after 100th test
IPL 2022 : पुण्याला 15 सामन्यांची मेजवाणी

विराट कोहलीच्या 100 व्या कसोटीत भारताने श्रीलंकेविरूद्ध (India vs Sri Lanka) फक्त पहिल्या डावातच फलंदाजी केली. भारताने पहिल्या डावात 574 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली या सामन्यात शतक झळकावून चाहत्यांना एक अविस्मरणीय भेट देईल असे वाटत होते. मात्र तो 45 धावा करून बाद झाला. या कसोटीचा हिरो ठरला तो रविंद्र जडेजा. त्याने फलंदाजीत नाबाद 175 धावा ठोकल्याच, याचबरोबर श्रीलंकेच्या पहिल्या डावात 5 आणि फॉलो ऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात 4 विकेट अशा एकूण 9 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.