कोहलीसाठी कायपण! नेटकऱ्यांनी गांगुली-जय शाहांची घेतली शाळा

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी सिरिजमधील पराभवानंतर विराटने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा सामना भारताने ७ विकेटने गमावल्यानंतर भारताचा या मालिकेत २-१ असा परभव झाला आणि दुसऱ्याच दिवशी विराटने राजीनामा दिला.

याअगोदर विराटने T-20 विश्वचषकानंर आपल्या T-20 क्रिकेटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराटला एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपदावरुन काढलं होतं. त्यानंतर विराटकडे फक्त कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद राहिले होते.

कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वांत यशस्वी कर्णधार

कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाची धुरा २०१४ साली विराट कोहलीच्या हातात आली होती. आपल्या कारकिर्दीत विराटने भारताला मोठमोठे विजय मिळवून दिले आहेत. विराटने भारतीय क्रिकेटची धुरा हाती घेतली तेव्हा जागतिक तुलनेत भारताची रॅंकिंग ही ७ व्या स्थानावर होती. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताची रॅंकिंग पहिल्या स्थानावर आली आहे. तो आत्तापर्यंतच्या काळातील यशस्वी कर्णधार राहीला आहे. पण त्याने अचानक आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

विराटच्या राजीनाम्यानंतर सर्व दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिनने म्हटलंय की, ''कर्णधारपदाचा यशस्वी कार्यकाळ संपला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा, तू संघासाठी तुझं १०० % योगदान दिले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा.''

याचबरोबर विराटच्या अनेक चाहत्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली असून विराटसोबत राजकारण झाल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर केल्या आहेत. तसेच BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केला गेला होता. तसेच त्यांच्यावर टीकाही केली.

अनेक नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करताना थेट BCCI अध्यक्ष सौरव गांगुली व जय शहा यांच्यावर निशाना साधला आहे. ट्विटरवरील एका व्हिडिओत विराटच्या राजीनाम्यानंतर गांगुली व जय शहा आनंदाने नाचनाचे मीम्स व्हायरल होत आहेत.

विराटच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर काही हॅशटॅग ट्रेंड झाले होते.

#DADA

#JayShaha

#ShameOnBCCI

#ViratKohli

विराटच्या राजीनाम्यानंतर काही दिग्गजांच्या प्रतिक्रिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.