Virat Kohli Test Captain : विराट कोहली पुन्हा कसोटी कर्णधार... काय म्हणाले माजी निवडसमिती अध्यक्ष?

Virat Kohli Test Captain
Virat Kohli Test Captainesakal
Updated on

Virat Kohli Test Captain : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने जानेवारी 2022 मध्ये भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कॅप्टन्सीवरून देखील हटवण्यात आलं. दरम्यान, माजी निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सध्याच्या निवडसमिती विराट कोहलीला पुन्हा कसोटी कर्णधार का केलं जात नाही असा प्रश्न विचारला.

Virat Kohli Test Captain
Archer Parth Salunkhe : सुवर्ण पदकाचा वेध घेत इतिहास रचणारा साताऱ्याचा आर्चर 'पार्थ' आहे तरी कोण?

एमएसके प्रसाद यांनी हार्दिक पांड्या हा मर्यादित षटकांत टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार असेल आणि रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद भुषवेल याबाबत शंका व्यक्त केली.

खेळ नाऊला दिलेल्या मुलाखतीत एमसएके प्रसाद म्हणतात की, 'मला माहिती नाही की मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की नाही. मला निवडसमितीची मानसिकता माहिती नाही. सहसा WTC च्या सायकलबाबत स्पष्टता असावी अशी मानसिकता निवडसमितीची असते.' (Virat Kohli Captaincy News)

एमएसके प्रसाद यांनी जर निवडसमिती रोहितव्यतिरिक्त इतर कोणाचा विचार करत असेल तर विराट कोहली देखील चांगला पर्याय असल्याचे म्हणाले.

Virat Kohli Test Captain
Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सला मिळणार नवा कोच; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे नाव आघाडीवर

प्रसाद म्हणाले की, 'विराट कोहली का नाही? जर अजिंक्य रहाणे पुनरागमनानंतर थेट उपकर्णधार होऊ शकतो तर विराट कोहली कर्णधार का होऊ शकत नाही? मला माहिती नाही की त्यांची विराटला कर्णधार करण्याबाबत काय मानसिकता आहे. जर निवडसमिती रोहित सोडून दुसरा कोणाचा विचार करत असेल तर विराट कोहली देखील एक पर्याय आहे. मला माहिती नाही की ते असा विचार करत आहेत की नाही.'

विराट कोहली सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. तेथे भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरूवातीला भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा डॉमिनिका आणि दुसरा सामना हा त्रिनिदाद येथे होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.