Ind vs Sa : मागच्या वेळी कर्णधारपद सोडलं अन् यावेळी... कोहलीचा दक्षिण आफ्रिकेचा काय आहे प्लॅन?

विराटचा विजयी मार्ग; दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा नवा आव्हान
Ind vs Sa Series News
Ind vs Sa Series NewseSakal
Updated on

Ind vs Sa Series News : टीम इंडिया 10 डिसेंबरपासून आपले नवे मिशन सुरू करणार आहे, जे दक्षिण आफ्रिकेला त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत करायचे असणार आहे. प्रथम टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय संघ 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला खेळणार आहे.

पण दक्षिण आफ्रिकेचा दौरा म्हटले की आणखी एका घटनेची आठवण होते, ते म्हणजे विराट कोहलीची. कारण जेव्हा टीम इंडिया मागच्या दक्षिण आफ्रिका दोऱ्यावर गेली होती तेव्हा विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले होते.

Ind vs Sa Series News
Rahul Dravid : शारीरिक ताकद नाही तर... कोच राहुल द्रविड दक्षिण अफ्रिका दौरा सर्वात आव्हानात्मक असं का म्हणाला?

आता हा दौरा सुरू होणार असल्याने हा त्यांचा शेवटचा विदेश दौरा असू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. म्हणजेच विराट कोहली निवृत्तीकडे वाटचाल करू शकतो. आता या दाव्यात कितपत तथ्य आहे आणि विराट कोहली खरोखरच असा निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल.

खरं तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचं वक्तव्य आलं होतं. ज्यामध्ये तो म्हणाला की कदाचित आपण विराट कोहलीला शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेत खेळताना पाहत आहोत आणि आपण त्याला निरोप द्यायला हवा.

एबी डिव्हिलियर्स विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये बराच काळ खेळत आहे. दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आहे.

Ind vs Sa Series News
Gambhir vs Sreesanth : फिक्सर... चल बॉल कर! गंभीर-श्रीसंत वादावर नवा व्हिडिओ आला समोर

एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराट कोहली कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे जर त्याने टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतली असेल तर तो त्यास पात्र आहे. पण कसोटीत तो आपला दमदार खेळ दाखवेल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने यासाठी तयार राहावे. दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने असेही म्हटले की कोहलीचा हा शेवटचा दौरा असू शकतो, त्यामुळे त्याला चांगला निरोप देण्यास तयार आहोत.

Ind vs Sa Series News
Gambhir vs Sreesanth : संपूर्ण जग जेव्हा... श्रीसंत व्हिडिओवर व्हिडिओ टाकत असताना गंभीरनं केलं एका वाक्याचं ट्विट

टी-20 वर्ल्ड कप 2021 पराभवानंतर विराट कोहलीने टी-20 आणि नंतर ODI चे कर्णधारपद सोडले. विराट कोहली 2021-22 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी कर्णधार म्हणून गेला होता, पण टीम इंडियाने मालिका 1-2 ने गमावली. यानंतर विराट कोहलीने ट्विटरवर एक दीर्घ संदेश लिहून कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 7 वर्षे कसोटी फॉरमॅटमध्ये एक नंबरला होता. आणि प्रत्येक मोठ्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. विराट कोहलीनंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद फक्त रोहित शर्माकडेच होते. आता विराट कोहली दोन वर्षांनंतर पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जात असताना तो माजी कर्णधार आणि फक्त फलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.