Coromandel Express Train Accident : विराट कोहलीने ओडिसा रेल्वे अपघातावर केले ट्विट, म्हणाला...

Coromandel Express Train Accident Virat Kohli Tweet
Coromandel Express Train Accident Virat Kohli Tweetesakal
Updated on

Coromandel Express Train Accident Virat Kohli Tweet : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ओडिसामधील कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वे अपघातानंतर ट्विटकरून दुःख व्यक्त केले आहे. ओडिसा मधील बालासोर येथे तीन रेल्वे एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात मृतांची संख्या ही 238 वर पोहचली असून तब्बल 900 प्रवासी जखमी झाले आहेत. भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.

विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. त्याने ओडिसा रेल्वे अपघाताबाबत ट्विट करून आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.

Coromandel Express Train Accident Virat Kohli Tweet
Ruturaj Gaikwad Wedding: प्री-वेडिंगला फाटा; सिंपल मेहंदी, ऋतुराजच्या लग्नातला साधेपणा महाराष्ट्राला आदर्श

विराटने ट्विट केले की, 'ओडिसामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबाबत ऐकून दुःख झाले. ज्या कुटुंबांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती गमावल्या त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.' विराट कोहली सोबतच विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील प्रतिक्रिया देत सहवेदना व्यक्त केल्या.

Coromandel Express Train Accident Virat Kohli Tweet
Wrestlers Protest : 2 कुस्तीपटू, 1 रेफरी, 1 कोच यांनी दिली विरोधात साक्ष, ब्रिजभूषण पुरते अडकले?

दरम्यान, कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

या अपघातात शालिमार - चेन्नईन सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू - हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालवाहू रेल्वे यांची धडक झाली. अपघातानंतर बचाव कार्य सुरू झाल्यानंतर या परिसरातील सर्व रूग्णालयांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ओडिसाच्या मुख्य सचिव प्रदीप यांनी ओडिसा डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या चार तुकड्या, एनडीआरएफच्या तीन आणि 15 पेक्षा जास्त अग्नीशमन दलाच्या तुकड्या, 30 वैद्यकीय कर्मचारी, 200 पोलीस कर्मचारी आणि 60 रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 10 लाख रूपये तर गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमी व्यक्तींसाठी 50 हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.