Virat Kohli : कोहलीने पंजाबी सिंगर शुभनीत खलिस्तानी आंदोलन समर्थक असल्याचे समजताच उचललं मोठं पाऊल

Virat Kohli Punjabi Singer Shubh
Virat Kohli Punjabi Singer Shubh esakal

Virat Kohli Punjabi Singer Shubh : प्रसिद्ध पंजाबी गायक शुभनीत सिंगने (शुभ) सार्वजनिकरित्या वादग्रस्त खलिस्तानी आंदोलनला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट केली होति. यानंतर त्याच्यावर टीका होत आहे. त्याला मुंबईमधील आपला एक शो देखील गमावावा लागला आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील आपलं अंग झटकलं असून त्याने शुभला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

Virat Kohli Punjabi Singer Shubh
Mohammed Siraj ODI Ranking : रँकिंगचा सरताज पुन्हा मोहम्मद सिराज! आयसीसीने केली मोठी घोषणा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानावर ज्या प्रकारे उत्साह दर्शवतो तसाच उत्साह हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील असतो. विराटने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले होते की टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये फक्त पंजाबी गाणीच वाजत असतात.

विराट कोहली हा पंजाबी गाण्यांचा चाहता आहे. मात्र नुकत्याच झालेल्या घडामोडीनंतर विराट कोहलीने प्रसिद्ध पंजाबी गायक शुभला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. खलिस्तान आंदोलक हे पंजाबला भारतापासून वेगळं करण्याची मागणी करतात.

Virat Kohli Punjabi Singer Shubh
Video: ख्वाब 2011से जागा है... टीम इंडियाच चिलखत तयार, मोहीम फत्ते करण्याची केली गर्जना

दरम्यान, युवकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शुभने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भारताचा असा नकाशा ठेवला ज्यात पंजाब, काश्मीर, उत्तर पूर्व भारताचा बराचसा भाग गायब होता. याला शुभने पंजाबसाठी प्रार्थना करा' असे कॅप्शन दिले. या वादग्रस्त पोस्टनंतर शुभला मुंबईमधील एक शो गमवावा लागला आहे. शुभचा खरा चेहरा समोर येताच विराट कोहलीने त्याला अनफॉलो करून टाकलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com