रोहितला उपकर्णधार पदावरुन हटवण्याची विराटने केली होती मागणी

आता संघात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत.
Virat Kohli And Rohit Sharma
Virat Kohli And Rohit SharmaFile Photo
Updated on

मुंबई: तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराटने टी२० विश्वचषक स्पर्धा (T20 world cup) २०२१ नंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय काल जाहीर केला. विराटने (Virat kohli) अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. कर्णधारपद (captain) सोडताना विराटने वर्कलोडचं कारण दिलं आहे. पण आता संघात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. विराटने बीसीसीआयच्या निवड समितीकडे (BCCI Selection Committee) रोहित शर्माला उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव दिला होता, अशा बातम्या आता समोर येत आहेत.

आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरल्यास विराटला एकदिवसीय आणि टी२० च्या कर्णधारपदावरुन हटवून त्याच्याजागी रोहित शर्माची निवड होऊ शकते, अशी माध्यमांमध्ये चर्चा सुरु होती. येत्या १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. विराटने टी२०चे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले असेल, तरी अन्य दोन फॉरमेटच्या कर्णधारपदावर तो कायम राहणार आहे. विराटचे एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सुरक्षित नसल्याचे संकेत पीटीआयच्या वृत्तामधुन देण्यात आले आहेत. क्रिकेट अ‍ॅडिक्टर वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.

Virat Kohli And Rohit Sharma
विकृती! ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

विराटने ट्वीटरवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले आहे की...

मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. कारण मला भारतीय संघात खेळायची तर संधी मिळालीच पण त्यासोबतच संघाचे नेतृत्वदेखील करण्याची संधी मिळाली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून प्रवास सुरू असताना ज्यांना मला पाठिंबा दर्शवला त्या साऱ्यांचा मी आभारी आहे. माझे पाठीराखे, फॅन्स, संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, प्रशिक्षक आणि इतर सर्व जणांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या साऱ्यांच्या पाठिंब्यानेच मी यशस्वी होऊ शकलो.

Virat Kohli And Rohit Sharma
जान मोहम्मदबाबत धक्कादायक माहिती आली समोर, बहरीनला करणार होता एकाची हत्या?

आपल्यावर पडणारा कामाचा ताण आणि शारिरीक ताण ओळखणे ही महत्त्वाची गोष्ट असते. गेल्या ८-९ वर्षात मी खूप क्रिकेट खेळलो आहे. गेले ५-६ वर्षांपासून मी तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधाराची भूमिका बजावतो आहे. पण आता मला स्वत: थोडा वेळ देणं गरजेचं आहे. त्यासोबतच संघाला कसोटी आणि वन डे कर्णधार म्हणून आणखी पुढे घेऊ जाण्यावर मला लक्ष केंद्रीत करायचं आहे. आतापर्यंत मी टी२० संघाला कर्णधार म्हणून सर्वस्व अर्पण केलं आहे. यापुढेही मी संघात एक फलंदाज म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी मी खूप वेळ विचार केला. संघ व्यवस्थापन, रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर अखेर मी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. BCCI चे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समिती यांच्याशी याबद्दल मी आधीच बोललो होतो. त्यांनी मला या निर्णयात पाठिंबा दिला. कर्णधारपद सोडलं असलं तरी संघातील खेळाडू म्हणून मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यास नेहमीच प्रयत्नशील असेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.