Virat Kohli World Cup : विराटला कर्णधारपदावरून काढलं भारत जिंकत नाही... पाकच्या माजी खेळाडूने उधळली मुक्ताफळे

Virat Kohli World Cup 2023
Virat Kohli World Cup 2023esakal
Updated on

Virat Kohli World Cup 2023 : भारतीय संघाने क्रिकेट विश्वात एक संघ म्हणून मोठी कामगिरी केली आहे. आयसीसी रँकिंगमध्ये देखील भारतीय संघ तीनही फॉरमॅटमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असतोच. मात्र 2013 पासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यासारखे दर्जेदार आणि गुणवान खेळाडू आहेत. तरी देखील भारताला आयसीसी ट्रॉफीत विजेतेपद मिळवण्यात यश आलेले नाही.

विराट कोहलीनंतर रोहितला देखील आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही. याबाबत पाकिस्तानचे माजी खेळाडू राशिद लतिफ यांनी एक मोठं आणि धक्कादायक वक्तव्य केलं आहे. (Virat Kohli World Cup 2023 Rashid Latif Statement about captaincy)

Virat Kohli World Cup 2023
WI vs IND 5th T20I : किंग - पूरनची शतकी भागीदारी, भारताने मालिका गमावली

लतिफ आपल्या यूट्यूब चॅनवर बोलताना म्हणाले, 'विराट कोहलीकडे एक व्हिजन आहे आणि तो जिंकण्याच्या इच्छा देखील बाळगतो. मात्र त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. हा संघ चांगली कामगिरी करू शकत नाहीये कारण या संघात अतंर्गत वाद आहेत. ते आयसीसी ट्रॉफीमध्ये कामगिरी करू शकत नाहीत कारण कर्णधाराला त्याला हवा तसा संघ मिळत नाहीये.'

ते पुढे म्हणाले की, 'त्यांचा संघ अजूनही खूप मजबूत आहे. त्यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाज मिळून जाईल. ज्यावेळी पहिले तीन फलंदाज लवकर बाद होतील त्याचवेळी त्यांना अडचण येईल. मात्र त्यांचे पहिले तीन फलंदाज 25 - 30 षटके खेळून गेले तर ते सहज जिंकतील.'

'त्यांची समस्या ही त्यांचे पहिले तीन फलंदाज जशी कामगिरी करायला हवी तशी करत नाहीयेत. त्यांनी शिखर धवनला पुन्हा संघात घेतले पाहिजे. तुम्ही त्याला काही काळापूर्वी संघाचा कर्णधार केलं होते. तुमच्याकडे खेळाडू आहेत. मात्र तुम्ही त्यांना इतकं तिकडं फेकलं आहे.'

Virat Kohli World Cup 2023
Rohit Sharma Virat Kohli : रोहित - विराट करणार निवृत्तीची घोषणा; 2023 वर्ल्डकपनंतर संघात होणार मोठे बदल?

विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यापासून भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी 20 वर्ल्डकप (2022), WTC फायनल (2023) हरली आहे. रोहित शर्माला आता भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये 10 वर्षाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.