'हा तो विराट नाही जो आम्ही ओळखतो'

क्रिकेट जगतात किंग कोहली म्हणून ओळखणारा विराट सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे.
Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट जगतात किंग कोहली म्हणून ओळखणारा विराट सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. प्ले-ऑफपूर्वी, किंग कोहलीने निश्चितपणे 73 धावांची इनिंग खेळली होती, त्यामुळे तो फॉर्ममध्ये परतला अशी चर्चा रंगली, परंतु प्लेऑफच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने लवकर आऊट होत चाहत्यांच्या आशेवर पाणि फेरले. विराटच्या या खराब फॉर्मवर क्रिकेट जगतातून अनेक दिग्गज आपले मत व्यक्त करत आहेत. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने विराटवर प्रतिक्रिया देत हा तो विराट नाही जो आम्ही ओळखतो म्हटलं आहे.

Virat Kohli
RCB ला ती चूक चांगलीच महागात पडली, एका मॅचसाठी धडपडत होता 'हा' खेळाडू

आयपीएल २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये, कोहलीने 22.73 च्या सरासरीने केवळ 341 धावा केल्या आहेत. ज्या दरम्यान त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात कोहलीने 24 चेंडूत 25 धावांची संथ खेळी खेळली, तर क्वालिफायर 2 मध्ये तो राजस्थानविरुद्ध 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्याच्या या खराब कामगिरीवर सेहवागने क्रिकबजच्या शोमध्ये भाष्य केलं. 'जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा तुम्हाला प्रत्येक चेंडू बॅटच्या मधोमध खेळावा लागतो. जर चेंडू बॅटच्या मध्यभागी आदळला तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. पहिल्या षटकात त्याने काही चेंडू टाकले पण जेव्हा तुम्ही फॉर्मात नाही, मग चेंडू बाहेर जातो. कधी कधी तुमचे नशीब चांगले असते, तेव्हा वाईट काळातही बॅट चालते. आणि तुमचा बचाव होतो, पण इथे तसे झाले नाही.' असे सेहवाग म्हणाला.

Virat Kohli
शेन वॉर्नच्या आठवणीत बटलर भावुक; राजस्थान १४ वर्षांनी फायनलमध्ये

तसेच, हा विराट कोहली नाही ज्याला आपण ओळखतो, कदाचित या मोसमात तो दुसरा विराट कोहली खेळताना दिसत असेल. कोहलीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत या मोसमात जितक्या चुका केल्या असतील तितक्या चुका केल्या नसतील. जेव्हा तुमच्या धावा होत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करताना आणि वेगवेगळ्या प्रकारे आऊट होताना दिसत आहे. यावेळी विराट कोहली प्रत्येक प्रकारे बाहेर आहे. अशी खंत सेहवाने यावेळी व्यक्त केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लीग टप्प्यातील 8 सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरले. एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचा पराभव झाला, मात्र राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने संघाचे पुन्हा एकदा विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()