Virender Sehwag : आम्ही सचिनसाठी खेळलो तुम्ही... आयसीसीच्या कार्यक्रमात सेहवाग काय म्हणाला?

Virender Sehwag
Virender Sehwagesakal
Updated on

Virender Sehwag : वनडे वर्ल्डकप 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली. त्यानंतर आता भारतात वर्ल्डकपचा फिव्हर हळूहळू चढू लागला आहे. भारताला 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताने शेवटचा वनडे वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. या विजेत्या संघातील खेळाडू विरेंद्र सेहवागने भारतीय संघाला विजयाचा कानमंत्र दिला.

आयसीसीने आज वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. वर्ल्डकपची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार असून फायनल सामना हा 19 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवागने आयसीसीच्या कार्यक्रमात भारतीय संघाला एक कानमंत्र दिला.

Virender Sehwag
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबाबत आली मोठी अपडेट; आयर्लंड मालिकेसाठी...

विरेंद्र सेहवाग म्हणाला, 'आम्ही वर्ल्डकप सचिन तेंडुलकरसाठी खेळला होता. आम्ही वर्ल्डकप जिंकून सचिन पाजींना चांगला निरोप दिला. विराट कोहली आता सचिन तेंडुलकरच्या जागी आहे. तो जबरदस्त क्रिकेट खेळत आहे. दुसऱ्यांची काळजी घेत आहे. प्रत्येकाला विराट कोहलीसाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे.'

सेहवाग पुढे म्हणाला की, 'विराट कोहलीमध्ये कोणताच बदल झालेला नाही. तो संघासाठी आपले सर्वस्व देतोय. मला असं वाटतंय की खुद्द विराट कोहलीला देखील हा वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा असले.'

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल सेहवाग म्हणाला, 'नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखापेक्षा अधिक लोक हा सामना पाहतील. विराट कोहलीला खेळपट्टी कशी आहे हे माहिती आहे. मला विश्वास आहे की विराट कोहली या वर्ल्डकपमध्ये धावांचा पाऊस पाडेल आणि भारतासाठी आपली सर्वोकृष्ट कामगिरी करेल.'

Virender Sehwag
World Cup 2023 : निवडसमिती देऊ शकतो मोठा धक्का, या 5 खेळाडूंची वर्ल्डकपमध्ये होणार एन्ट्री?

विरेंद्र सेहवागने भारत पाकिस्तान सामन्यात भारताचेच पारडे जड असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, 'मला वाटते की पाकिस्तानविरूद्ध भारत चांगल्या प्रकारे दबाव झेलू शकतो. 1990 मधला पाकिस्तानचा संघ दबावात चांगली कामगिरी करण्यात तरबेज होता. मात्र 2000 नंतर भारतीय संघ याबाबतीत आघाडीवर राहिला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()