Virender Sehwag : अशा चुका महेंद्रसिंह धोनीकडून अपेक्षित नाहीत... सेहवागने कान टोचले

Virender Sehwag Take A Dig On MS Dhoni
Virender Sehwag Take A Dig On MS Dhoni ESAKAL
Updated on

Virender Sehwag Take A Dig On MS Dhoni : भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण असे विचारले तर नक्कीच महेंद्रसिंह धोनीचे नाव सर्वात जास्त लोकं घेतील. भारताचा कर्णधार असताना आणि चेन्नईचे नेतृत्व करताना देखील धोनी सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. मात्र आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात त्याने घेतलेले निर्णय भारताचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवागच्या काही पचनी पडले नाहीत.

Virender Sehwag Take A Dig On MS Dhoni
Ruturaj Gaikwad : भारतीय संघ नक्कीच.. ऋतुराजच्या खेळीने डोळे उघडलेल्या हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

महेंद्रसिंह धोनीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची निवड केली होती. फलंदाजीत ऋतुराज वगळता इतर फलंदाजांनी यथा तथा कामगिरी केल्याने सीएसकेने 20 षटकात 178 धावांपर्यंतच मजल मारली. त्यानंतर गोलंदाजीत राजवर्धन हंगरगेकरने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र तुषार देशपांडेने भरपूर धावा (51) दिल्याने चेन्नईला सामना जिंकता आला नाही.

विरेंदर सेहवागने याचबाबतीत धोनीच्या नेतृत्वावरून त्याला चिमटा काढला. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग म्हणाला की, 'धोनीने मोईन अलीचा मधल्या षटकात वापर केला का, जर त्याने तो वापर केला असता तर त्याला तुषार देशपांडेला मोक्याच्या क्षणी गोलंदाजी देण्याची गरज भासली नसती. तुषारने खूप मार खाल्ला.'

Virender Sehwag Take A Dig On MS Dhoni
Ravi Shastri IPL 2023 : रवी शास्त्री पुन्हा गोंधळले; अजूनही WPL चाच हँगओव्हर

सेहवाग पुढे म्हणाला की, 'धोनीकडून अशा चुका अपेक्षित नसतात. मात्र तुम्ही धोका पत्करा आणि बक्षीस मिळवा या रणनितीचा वापर करायला हवा होता. तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजाविरूद्ध ऑफ स्पिनर वापरायला हवा होता.'

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()